ATM मधून पैसे काढण्यासोबतच करू शकता 'ही' महत्वाची 10 कामे; पाहा संपूर्ण यादी... By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 03:57 PM 2024-05-20T15:57:45+5:30 2024-05-20T16:05:45+5:30
फार कमी लोकांना माहिती असेल की, ATM चा वापर अनेक कारणांसाठी केला जातो. जेव्हा ATM ची चर्चा होते, तेव्हा एकच गोष्ट डोक्यात येते आणि ती म्हणे पैसे काढणे. बँकेत न जाता ग्राहकांना रोख रक्कम देणे, हे एटीएमचे मुख्य कार्य आहे. पण, फार कमी लोकांना माहिती असेल की, एटीएमचा वापर इतर अनेक कारणांसाठी केला जातो. एटीएममधून पैसे काढण्यासोबत तुम्ही इतर अनेक गोष्टी करू शकता.
1- पैसे काढता येतात- प्रत्येकाला माहित आहे की, एटीएममधून पैसे काढले जाऊ शकतात. रोख रक्कम देणे, हे एटीएमचे मुख्य कार्य आहे. यासाठी तुमच्याकडे तुमचे एटीएम कार्ड, म्हणजेच डेबिट कार्ड असणे गरजेचे आहे. एटीएममध्ये कार्ड टाकून तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे काढू शकता.
2- बॅलेंस तपासणे, मिनी स्टेटमेंट पाहणे- अनेकजण एटीएमद्वारे त्यांच्या खात्यातील शिल्लक तपासतात. याशिवाय, तुम्ही तुमच्या खात्यात झालेले व्यवहारदेखील तपासू शकता. मिनी स्टेटमेंटमध्ये तुम्हाला शेवटचे 10 व्यवहार दिसतात.
3- एका कार्डवरुन दुसऱ्या कार्डवर पॅसे ट्रांसफर- स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार, तुम्ही एका एसबीआय डेबिट कार्डवरुन दुसऱ्यामध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता. याद्वारे दररोज 40 हजार रुपयांपर्यंत ट्रान्सफर करता येते. यासाठी बँकेकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. यासाठी तुमच्याकडे तुमचे एटीएम कार्ड आणि पिन माहित असणे आवश्यक आहे. शिवाय, ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत, त्या व्यक्तीचा कार्ड नंबरदेखील तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.
4- क्रेडिट कार्ड पेमेंट- एटीएमद्वारे तुम्ही कोणत्याही VISA कार्डची पेमेंट करू शकता. पण, यासाठी तुमचे कार्ड जवळ असणे आणि त्याचे पिन माहित असणे गरजेचे आहे.
5- एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रांसफर- तुम्ही एटीएमद्वारे एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रांसफर करू शकता. एका एटीएम कार्डसोबत जास्तीत जास्त 16 अकाउंट जोडले जाऊ शकतात.
6- जीवन विमा प्रीमियम भरणे- तुम्ही एटीएम वापरुन विमा प्रीमियम देखील भरू शकता. एलआयसी, एचडीएफसी लाइफ आणि एसबीआय लाइफ सारख्या अनेक विमा सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी बँकांशी करार केला आहे. या अंतर्गत तुम्ही संपूर्ण सुरक्षिततेसह एटीएमद्वारे तुमच्या विम्याचा हप्ता भरू शकता. यासाठी तुम्हाला पॉलिसी क्रमांकाची गरज आहे.
7- चेक बुक रिक्वेस्ट- तुम्हाला नवीन चेकबुकसाठी आता बँकेत जाण्याची गरज नाही. तुम्ही एटीएमद्वारे चेकबुक रिक्वेस्ट पाठवू शकता. नवीन चेकबुक थेट तुमच्या पत्त्यावर येऊन जाईल. तुम्हाला पत्ता बदलायचा असेल, तर तोदेखील तुम्ही बदलू शकता.
8- बिल पेमेंट- तुम्ही एटीएम वापरुन तुमचे कोणतेही युटिलिटी बिल भरू शकता. पण, ज्या कंपनीचे बिल भरायचे आहे, तिचा बँकेशी टाय-अप झालेला असायला हवा. आजकाल खूप कमी लोक याचा वापर करतात.
9- मोबाइल बँकिंग रजिस्ट्रेशन- आजकाल अनेक बँका अकाउंट ओपन करताच इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग सुरू करतात. पण, जर तुमचे मोबाइल बँकिंग अॅक्टिव्ह नसेल, तर तुम्ही एटीएमद्वारे हे अॅक्टिव्ह करू शकता.
10- एटीएम पिन बदलणे- तुम्हाला तुमच्या एटीएम कार्डचा पिन बदलायचा असेल, तर तुम्हाला ही सुविधा एटीएममध्ये मिळते. तुमचा पिन वेळोवेळी बदलत राहणे ही चांगली सवय आहे, ज्यामुळे तुम्ही सायबर फसवणुकीच्या धोक्यापासून दूर राहू शकता.