लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेटचे लेटेस्ट रेट By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 02:33 PM 2024-11-13T14:33:54+5:30 2024-11-13T14:44:50+5:30
या महिन्यात सोने 4515 रुपयांनी तर चांदी 8695 रुपयांनी स्वस्त झाली आहे... लग्नसराईचा हंगाम सुरू होताच सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल होताना दिसत आहे. आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट सोने 266 रुपयांनी महागले असून 75166 रुपये प्रति 10 ग्रॅमवर खुले झाले. तर चांदीच्या दरात 1393 रुपयांची मोठी वाढ झाली आहे.
तत्पूर्वी, या महिन्यात सोने 4515 रुपयांनी तर चांदी 8695 रुपयांनी स्वस्त झाली आहे. 30 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव 79681 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 98340 रुपये प्रति किलो होता. हा दर IBA चा आहे, यात GST चा समावेश करण्यात आलेला नाही. आज चांदी 88305 रुपये प्रति किलो दराने खुली झाली.
14 ते 23 कॅरेट सोन्याचा दर - आज 23 कॅरेट सोन्याचा दर सरासरी 265 रुपयांनी वाढून 74865 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 244 रुपयांनी वाढून 68852 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला.
तसेच, 18 कॅरेट सोन्याचा दर आज 200 रुपयांनी वाढून 56375 रुपये प्रति 10 ग्रॅमवर खुला झाला. तर, 14 कॅरेट सोन्याचा भाव आज 155 रुपयांनी वाढून 43972 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उघडला.
दिल्ली ते मुंबईपर्यंत असा आहे सोन्या-चांदीचा दर - दिल्ली सराफा बाजाराचा विचार करता आज येथे सोन्याचा भाव 77463.00 रुपये प्रति 10 ग्रॅम एढा आहे. लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, मंगळवारी सोन्याचा भाव 78933.0/10 ग्रॅम होता आणि तर गेल्या आठवड्यात 7 नोव्हेंबरला सोन्याचा भाव 78733.0/10 ग्रॅम होता. तसेच, आज चांदीचा भाव 94100.0 रुपये/किलो आहे. मंगळवारी चांदीचा दर 96100.0/kg होता, तर 7 नोव्हेंबरला चांदीचा दर 96100.0/kg होता.
आज चेन्नईमध्ये सोन्याचा भाव 77311.00 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा भाव 102700.0/किलो आहे. मंगळवारी चांदीचा भाव 104700.0/kg होता आणि गेल्या आठवड्यात तो 104700.0/kg होता.
मुंबईत आज सोन्याचा भाव 77317.00 रुपये प्रति 10 ग्रॅम असून मंगळवारी तो 78787.0/10 ग्रॅम होता. तर, चांदीची किंमत 93400.0/किलो आहे. कोलकातामध्ये आज सोन्याचा भाव 77315.0 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर, चांदीची किंमत 94900.0/kg आहे.