Gold Price Today: मोठी संधी! सोन्याचा दर महिनाभरातील सर्वाधिक नीचांकी पातळीवर, जाणून घ्या लेटेस्ट दर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 08:29 PM2021-09-09T20:29:55+5:302021-09-09T20:33:46+5:30

Gold Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घट झाल्यानं सोनं खरेदी करणं आता स्वस्त झालं आहे. काय आहे आजचा लेटेस्ट दर जाणून घ्या...

सोन्याचा आजचा दर महिन्याभरातील सर्वात नीचांकी पातळीवर आला आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा दर प्रति १० ग्रॅममागे १९६ रुपयांनी कमी झाला आहे.

चांदीच्या दरातही आज घसरण पाहायला मिळत आहे. एक किलो चांदीची किंमत ६३ हजार रुपये इतकी आली आहे.

अमेरिकन डॉलरच्या वाढीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर कमी होत असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस सोन्याच्या दरात आणखी घसरण झालेली पाहायला मिळू शकते.

देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅमसाठी ४३ हजारांपर्यंत खाली येऊ शकतात असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी सुगीचे दिवस येणार आहेत.

दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे १९६ रुपयांची घट नोंदविण्यात आली असून ४५ हजार ९५२ रुपये इतका दर आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारतही सोन्याच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळत आहे. बाजारातील किंमत प्रति औंस १८०० डॉलरच्या खाली गेली आहे.

चांदीच्या दरात आज तब्बल ८३० रुपयांची घट नोंदविण्यात आली आहेय चांदीचा आजचा दर प्रतिकिलो ६२ हजार ७१५ रुपयांवर आला आहे. याआधी हाच दर ६३ हजार ५४५ रुपये इतका होता.

सोन्याच्या दागिन्यांप्रमाणेच गोल्ड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं देखील फायदेशीर ठरणारं आहे. दरमहा १ हजार रुपये एसआयपीच्या माध्यमातून गोल्ड म्युच्युअल फंडात गुंतवणुकीला तुम्ही सुरुवात करू शकता.

गोल्ड म्युच्युअल फंडात ३ वर्षांपेक्षा अधिक काळासाठी गुंतवणूक करणं दीर्घकाळ गुंतवणूक म्हणून समजलं जातं.