छप्परफाड कमाई; टाटा ग्रुपच्या 'या' शेअरनं ग्राहकांना केलं मालामाल, एका वर्षात 1 लाखाचे झाले 33 लाख! By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 06:53 PM 2022-01-10T18:53:38+5:30 2022-01-10T19:03:34+5:30
गेल्या वर्षभरात 'हा' शेअर 3232 टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी यात एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असले, तर त्याचे एका लाखाचे आता 33 लाख रुपयांपेक्षाही अधिक झाले असणार. शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून टाटा समूहाचा एक शेअर जबरदस्त भरारी घेत आहे. हा शेअर गेल्या 5 सत्रांत आज 21.50 टक्क्यांनी वाढून 276.35 रुपयांवर पोहोचला आहे.
आजही टीटीएमएलच्या स्टॉकमध्ये अप्पर सर्किट आहे. आज TTML चा शेअर 13.15 (5.00%) ची उसळी घेऊन 276.35 रुपयांवर पोहोचला आहे. या वर्षाचा विचार केल्यास आतापर्यंत या शेअरमध्ये 27.56 टक्क्यांची वाढ झाली आहे. (TTML Share Price Today)
टाटा समूहाची कंपनी असलेल्या टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड अर्थात TTML चा शेअर गेल्या एक वर्षापासूनच आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करत आहे. हा शेअर एकावर्षात 8.55 रुपयांवरून 276.35 रुपयांवर पोहोचला आहे.
गेल्या वर्षभरात 'हा' शेअर 3232 टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी यात एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असले, तर त्याचे एका लाखाचे आता 33 लाख रुपयांपेक्षाही अधिक झाले असणार.
एखाद्या गुंतवणूकदाराने महिनाभरापूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 186000 रुपयांपेक्षाही अधिक झाले असते. तसेच, एखाद्याने 6 महिन्यांपूर्वी TTML स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 6 लाख रुपयांपेक्षाही अधिक झाले असते.
काय करते टीटीएमएल? TTML ही Tata Teleservices ची उपकंपनी आहे आणि ती आपल्या सेगमेंटमध्ये मार्केट लीडर आहे. ही कंपनी व्हॉईस, डेटा सर्व्हीस देते. या कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक मोठी नावे आहेत.
बाजारातील जाणकारांच्या मते, गेल्या महिन्यात या कंपनीने कंपन्यांसाठी स्मार्ट इंटरनेट बेस्ड सर्व्हिस सुरू केली आहे. या सेवेत कंपन्यांना फास्ट इंटरनेटसह क्लाउड बेस्ड सिक्योरिटी सर्व्हिस आणि ऑप्टोमाइज्ड कंट्रोलही मिळत आहे. यामुळे या सेवेला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
क्लाउड आधारित सुरक्षा हे या सेवेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे, यामुळे डेटा सुरक्षित ठेवला जाऊ शकेल. जे बिझनेस डिजिटल तत्त्वावर चालत आहेत, त्यांना या लीज लाइनचा अत्यंत फायदा होईल.
यात सर्व प्रकारच्या सायबर फ्रॉडपासून सुरक्षिततेची व्यवस्था इन-बिल्ट करण्यात आली आहे. याच बरोबर फास्ट इंटरनेटची सुविधाही देण्यात आली आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)