PAN Aadhar Linking : पॅन-आधार लिंक करण्याबाबत मोठी अपडेट, 'या' तारखेपर्यंत लिंक न केल्यास होणार निष्क्रीय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 04:17 PM2021-06-26T16:17:49+5:302021-06-26T16:25:43+5:30

PAN Aadhar Linking online : पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करणं करण्यात आलं आहे अनिवार्य.

सरकारकडून पॅन-आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. परंतु याबाबत एक मोठी माहिती समोर आली असून सरकारनं यास मुदतवाढही दिली आहे. यापूर्वी ३० जून पर्यंत पॅन-आधार लिंक करणं अनिवार्य करण्यात आलं होतं.

सरकारनं पॅन-आधार लिंक करण्याची मुदत ३ महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड आता लिंक करता येणार आहे.

सर्वप्रथम ही मुदत ३१ मार्च २०२१ होती. त्यानंतर याला मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, सर्वांना ३० जूनपर्यंत पॅन आधार लिंक करणं अनिवार्य होतं. परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ही ३० सप्टेंबर करण्यात आली आहे.

इन्कम टॅक्स विभागानुसार जर पॅन कार्ड ठरलेल्या वेळेत आधार कार्डाशी लिंक न केल्यास, पॅन कार्ड निष्क्रीय होणार आहे. त्यानंतर तुमचं पॅन कार्ड काम करणार नाही.

जर तुम्ही आधार कार्डाशी पॅन कार्ड लिंक केलं नाही तर तुम्हाला १००० रूपयांचा दंडही भरावा लागू शकतो. त्यामुळे निर्धारित वेळेत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य आहे.

आयकर कायदा १९६१ मध्ये जोडण्यात आलेलं नवं कलम २३४एच मुळे हे झालं आहे. सरकारनं २३ मार्च रोजी लोकसभेत वित्त विधेयक २०२१ हे पारित केलं होतं.

जर कोणत्याही व्यक्तीनं अंतिम तारखेपर्यंत आधार कार्डाशी आपलं पॅन कार्ड जोडलं नाही तर ते रद्द करण्यात येणार आहे. तसंच त्यानंतर आर्थिक देवाणघेवाणीसाठी या पॅन कार्डाचा वापरही करता येणार नाही. याचा परिणाम बँकिंग, म्युच्युअल फंड, डीमॅट खातं, नवं बँक खातं उडण्यावर होईल. विना पॅन कार्ड तुम्ही कोणतंही काम करू शकणार नाही.

जर तुम्ही आपलं पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक केलं असेल तर तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून तुमचं स्टेटस तापसून पाहू शकता. यासाठी तुम्हाला https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वर जावं लागेल.

त्यानंतर त्या ठिकाणी Link Aadhaar या पर्यायावर क्लिक करा. आपलं स्टेटस पाहण्यासाठी Click Here वर क्लिक करा.

आपलं स्टेटस पाहण्यासाठी हायपर लिंक Click Here वर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार आणि पॅन कार्डाची माहिती भरावी लागेल. जर तुमचं पॅन आणि आधार लिंक असेल तर तुम्हाला your PAN is linked to Aadhaar Number हा मेसेज दिसेल.

जर तुमचं पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक नसेल तर तुम्हाला https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या लिंकवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर लिंक आधारवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी विचारण्यात आलेली माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुमचं पॅन कार्ड आधार कार्डाला लिंक होईल. एसएमएस सेवेचा वापर करण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये UIDPAN म्हणजेच तुमचा १२ अंकी आधार क्रमांक आणि १० अंकी पॅनकार्ड क्रमांक टाईप करा आणि हा मेसेज 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवा.

त्यानंतर तुमचं पॅनकार्ड आधारशी लिंक जाईल. यानंतर तुम्हाला https://www1.incometaxindiaefiling.gov.in/home या संकेतस्थळावर जाऊन लिंक आधार यावर क्लिक केल्यानंतर माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुमचं आधार कार्ड लिंक झालं आहे की नाही याची माहिती तुम्हाला मिळेल.

जर तुम्हाला पॅन आधार ऑनलाईन लिंक करणं जमलं नाही तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीनंही ते लिंक करू शकता. यासाठी PAN सर्व्हिस प्रोव्हायडर, NSDL किंवा UTIITSL सर्व्हिस सेंटरवर जाऊन PAN आणि आधार लिंक केलं जाऊ शकतं.

यासाठी ‘Annexure-I’ भरावं लागणार असून त्यासोबत तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्डाची कॉपीही द्यावी लागणार आहे. ही प्रक्रिया निशुल्क नाही. यासाठी तुम्हाला एक शुल्क द्यावं लागेल. हे शुल्क लिंकिंगच्या वेळी पॅन आणि आधार डिटेलमध्ये सुधारणा करण्यात आली आहे किंवा नाही यावर आधारित असेल.

Read in English