Star Health IPO News : तुम्हीही करू शकता झुनझुनवाला यांची भागीदारी असलेल्या कंपनीत गुंतवणूक; ३० नोव्हेंबरला येणार IPO

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 01:13 PM2021-11-24T13:13:09+5:302021-11-24T13:30:38+5:30

Share Market मधील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Ace Investor Rakesh Jhunjhunwla) यांचा स्टेक असलेली कंपनी सध्या IPO मुळे चर्चेत आहे.

शेअर मार्केट (Share Market) मधील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Ace Investor Rakesh Jhunjhunwla) यांचा स्टेक असलेली कंपनी सध्या IPO मुळे चर्चेत आहे. या कंपनीचं नाव Star Health and Allied Insurance Company आहे.

७२४९ कोटींचा आयपीओ आणणाऱ्या या कंपनीच्या आयपीओसाठी प्राईज बँडही निश्चित करण्यात आला आहे. कंपनीच्या या प्राईस बँडची रक्कम ८७ ० रूपये ते ९०० रूपयांच्या दरम्यान ठेवण्यात आली आहे.

Paytm आणि Zomato नंतर हा देशातील तिसरा सर्वात मोठा आयपीओ असणार आहे. पेटीएम आणि झोमॅटोनं शेअर बाजारातून आयपीओद्वारे अनुक्रमे १८३०० कोटी आणि ९३७५ कोटी रूपये जमवले होते.

स्टार हेल्थचा आयपीओ ३० नोव्हेंबर रोजी उघडणार आहे. तसंच २ डिसेंबरपर्यंत हा आयपीओ खुला राहिल. या आयपीओमध्ये २ हजार कोटी रूपयांचा फ्रेश इश्यूही असेल.

या आयपीओमध्ये ५८,३२४,२२५ शेअर्सचा ओएफएस (ऑफर फॉर सेल) असणार आहे. QIB साठी ७५ टक्के कोटा आरक्षित असेल, तर NII साठी १५ टक्के आणि रिटेल गुंतवणूदारांसाठी १० टक्के राखीव असेल.

जर IPO वरच्या प्राईस बँडवर सबस्क्राईब झाला तर देशातील मोठ्या प्रायव्हेट हेल्थ इन्शूरन्स समुहाचं मूल्यांकन हे ५१ हजार कोटी रूपये होईल. जर तुम्हाला स्टार हेल्थच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही चांगली संधी आहे.

कंपनीनं यासाठी ८७० रूपये ते ९०० रूपयांचा प्राईस बँड निश्चित केला आहे. एका लॉटमध्ये १६ शेअर्स असतील. यामध्ये तुम्हाला एका लॉटसाठी किमान १४४०० रूपयांची गुंतवणूक करावी लागेल.

स्टार हेल्थनं आयपीओसाठी KFintech Private Limited ची रजिस्ट्रार म्हणून नियुक्ती केली आहे. तर अँबिट प्रायव्हेट लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, BofA सिक्युरिटीज लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, CLSA इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, Credit Suisse Securities (India) प्रायव्हेट लिमिटेड यांची लीड मॅनेजर म्हणून नियुक्ती केली आहे.

तर दुसरीकडे सध्या मोठ्या प्रमाणात एलआयसीच्याही आयपीओची चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या LIC च्या IPO बाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. दीपम सचिव तुहिन पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, LIC चे मूल्यांकन पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

जर सर्व प्रक्रिया वेळेवर पूर्ण झाली, तर LIC चा IPO चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी-मार्च दरम्यान येईल. सरकारला LIC मधील १० टक्के हिस्सा विकायचा आहे आणि त्याद्वारे १ लाख कोटींचा निधी गोळा करण्याचे उद्दिष्ट आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, हा आयपीओ जगातील कोणत्याही विमा कंपनीने जारी केलेल्या आयपीओमध्ये दुसरा असेल. सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी निर्गुंतवणूक आणि खाजगीकरणासाठी १.७५ लाख कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, एलआयसी आयपीओ आणि बीपीसीएल (BPCL)ची निर्गुंतवणूक खूप महत्वाची आहे.

सरकारने चालू आर्थिक वर्षात ५-६ सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीची तयारी केली आहे. अशा स्थितीत डिसेंबर-जानेवारीपर्यंत अनेक कंपन्यांसाठी आर्थिक बोलीची प्रक्रिया सुरू होईल, अशी अपेक्षा आहे, असे पांडे यांनी म्हटले आहे. मात्र, यामुळे शेअर मार्केटवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

या आर्थिक वर्षात आतापर्यंत निर्गुंतवणुकीतून केवळ ९३३० कोटी रुपये जमा झाले आहेत. टाटा समूहाची कंपनी टालेस प्रायव्हेट लिमिटेडला एअर इंडिया विकण्यास सरकारने गेल्या महिन्यात मंजुरी दिली होती. त्या बदल्यात, सरकारला २७०० कोटी रुपये मिळाले आणि टॅलेसने एअरलाइनवर १५,३०० कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा उचलला.

सरकारी विमान कंपनी एअर इंडियाची कमान टाटा समूहाकडे सोपवण्याची प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी आशाही पांडे यांनी व्यक्त केली. एअर इंडियाच्या विक्रीनंतर सार्वजनिक युनिट्सच्या खाजगीकरणाची प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण केली जाऊ शकते.

यासाठी खासगी क्षेत्राचे सहकार्यही आवश्यक असल्याचे डीआयपीएएम सचिव पांडे यांनी सांगितले. जेव्हा सार्वजनिक उपक्रमांच्या विक्रीची प्रक्रिया सुरू होते, तेव्हा खासगी क्षेत्रालाही बोली लावून आपली भूमिका बजावावी लागते, असेही ते म्हणाले.