BPCL Share: 'या' सरकारी कंपनीने गुंतवणुकदारांना केले मालामाल; 1 लाखाचे झाले 2.77 कोटी...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 05:46 PM2022-10-06T17:46:07+5:302022-10-06T17:52:52+5:30

BPCL Bonus Share: आज आम्‍ही तुम्‍हाला अशा कंपनीविषयी सांगणार आहोत, जिने बोनस शेअर देऊन गुंतवणूकदारांना कोट्यधीश केले.

BPCL Share Price: अनेक खासगी कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. पण, आज आम्ही तुम्हाला अशा सरकारी कंपनीच्या शेअरबद्दल सांगणार आहोत, ज्याने बोनस शेअर्स देऊन गुंतवणूकदारांना करोडपती केले. या PSU कंपनीचे नाव भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड किंवा BPCL आहे. या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

बोनस शेअर्समुळे गुंतवणूकदार करोडपती- गेल्या 22 वर्षात या शेअरचे मूल्य 13.50 रुपयांवरून 311.60रुपयांवर गेले आहे. या 22 वर्षांतील बोनस शेअर्सच्या परताव्यावर नजर टाकली तर, गुंतवणूकदार करोडपती झाले आहेत. या स्टॉकने 1 लाख रुपयांचे 2.77 कोटी केले आहेत.

कंपनीने 4 वेळा बोनस शेअर्स दिले- 2000 पासून, BPCL ने 4 वेगवेगळ्या प्रसंगी गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सची घोषणा केली आहे. डिसेंबर 2000, जुलै 2012, जुलै 2016 आणि त्यानंतर जुलै 2017 मध्ये बोनस शेअर्स वितरित करण्यात आले आहेत.

किती बोनस शेअर्स देण्यात आले? कंपनीने 2000, 2012 आणि 2016 मध्ये 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जाहीर केले होते. यामध्ये एका शेअरवर एक बोनस शेअर देण्यात आला. 2017 मध्ये, कंपनीने 1:2 बोनस शेअर्सची घोषणा केली होती. यामध्ये प्रत्येक दोन इक्विटी शेअर्समागे एक बोनस शेअर जारी करण्यात आला.

बोनस शेअर्स 88,884 झाले- कंपनीच्या स्टॉकबद्दल बोलायचे झाले तर मे 2000 मध्ये त्याचे मूल्य 13.50 च्या पातळीवर होते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने त्यावेळी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याला 7,407 स्टॉक मिळाले असते. डिसेंबर 2000 चे बोनस शेअर्स मिळाल्यानंतर त्यांची संख्या 14,814 पर्यंत वाढली असती.

1 लाखाचे कोट्यवधी झाले- जुलै 2012 मध्ये जारी केलेल्या बोनस शेअर्सनंतर, तुमचे शेअर्स दुप्पट होऊन 29,628 झाले असते. जुलै 2016 नंतर, तुमच्या स्टॉकची संख्या 59,256 पर्यंत वाढली असेल. जुलै 2017 च्या बोनस शेअर्सचे वाटप केल्यानंतर ही संख्या 88,884 झाली असती. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 22 वर्षांपूर्वी 1 लाख गुंतवले असते, तर आज तुमच्याकडे 88,884 शेअर्स असते आणि तुमचे 1 लाख 2.77 कोटी झाले असते.

(डिस्‍क्‍लेमर: आम्ही वरील बातमीत शेअरची माहिती देत आहोत, हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. वाचकांनी आपल्या विवेकाने गुंतवणूक करावी.)