Britannia q1 profit jumps 118 percentage on robust sales of packaged food tuta
जबरदस्त! लॉकडाऊनमध्ये गरीबांसाठी बिस्कीट बनलं आधार; 'या' कंपनीला झाला डबल फायदा By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 12:53 PM2020-07-19T12:53:27+5:302020-07-19T13:10:28+5:30Join usJoin usNext कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन दरम्यान काही कंपन्यांच्या उत्पादनाला मागणी वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नफा झाला आहे. मागील वर्षांच्या तीन महिन्यांच्या तुलनेत या वर्षीच्या पहिल्या तीन महिन्यात ब्रिटानिया इंडस्ट्रीजना दुप्पट फायदा झाला आहे. देशभरात २४ मार्चच्या रात्रीपासून लॉकडाऊन जाहिर करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता वाहतुकीच्या सर्वच सेवा बंद करण्यात आल्या होत्या. या काळात आपल्या घरापासून लांब असलेले हजारो प्रवासी चालत आपल्या घराकडे निघाले. अशा स्थितीत खाण्यासाठी काहीही उपलब्ध नसताना बिस्किटंच गरिबांसाठी आधार बनली. कोणी स्वतःला खाण्यासाठी तर कोणी इतरांना मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बिस्किटांची खरेदी केली. बिस्किटांसह इतर खाद्यपदार्थ तयार करत असलेली कंपनी ब्रिटानिया इंडस्ट्रीजला २०२० या वर्षाच्या सुरूवातीच्या तीन महिन्यात ५४२.६८ कोटींचा फायदा झाला. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ११८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोनाच्या संकटकाळात बिस्किट आणि डेअरी प्रॉडक्ट्सच्या मागणीत जबरदस्त वाढ दिसून आली. लोकांनी ब्रिटानियासह अनेक बिस्कीट्स मोठ्या प्रमाणात घरात साठवून ठेवले. ब्रिटानियाला मागिल वर्ष २०१९ - २०२० च्या पहिल्या तीन महिन्यात २४८.६४ कोटींचा फायदा झाला होता. मागीलवर्षी या कंपनीच्या नफ्यात घसरण झाली होती. पण आता मात्र नफ्यात कमालीची वाढ झाली आहे. ब्रिटानिया इंडस्ट्रीजचे प्रमुख वरुण बेरी यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या माहामारीमुळे पहिल्या तीन महिन्यात अर्थव्यवस्थेत लॉकडाऊनमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कारखाने, डेपो, परिवहन, वितरण यांवर परिणाम झाला. कोरोनाच्या केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत. लोकांना उत्पादन पुरवण्यासाठी वितरण साळखी वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढे त्यांनी सांगितले की लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आल्यामुळे आता ग्रामीण भागात पुरवठा करण्यावर जास्त भर दिला जात आहे. (image Credit _ GoodHouse keeping) मागील काही महिन्यात पारले जी बिस्किटाच्या नफ्यातही कमालीची वाढ झालेली दिसून आली. टॅग्स :व्यवसायअन्नbusinessfood