BSNL : केवळ १२९ रूपये आणि मिळणार अनेक OTT प्लॅटफॉर्म्सचा अ‍ॅक्सेस

By जयदीप दाभोळकर | Published: February 5, 2021 03:59 PM2021-02-05T15:59:49+5:302021-02-05T16:13:25+5:30

सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडनं नुकताच एक बीएसएनएल सिनेमा प्लस हा प्लॅन लाँच केला आहे. मुख्यत: ही सेवा OTT प्लॅटफॉर्म्सकरिता आहे. याद्वारे बीएसएनएल ग्राहकांना उत्तम मनोरंजनाची सेवा उपलब्ध करून देणार आहे.

केवळ १२९ रूपयांमध्ये बीएसएनएलच्या ग्राहकांना SonyLIV, Voot सह अनेक OTT प्लॅटफॉर्म्सचा फायदा देण्यात येणार आहे.

बीएसएनएलच्या या एकत्रित सेवेची किंमत १९९ रुपये प्रति महिना इतकी आहे. परंतु इंट्रोडक्टरी प्राईज म्हणून बीएसएनएल ग्राहकांना केवळ १२९ रूपयांमध्ये ही सेवा देत आहे.

सुरूवातीच्या तीन महिन्यांसाठी इंट्रोक्टरी प्राईज लागू होणार आहे.

याव्यतिरिक्त BSNL Cinema Plus service मध्ये ग्राहकांना ३०० पेक्षा अधिक टीव्ही चॅनल आणि ८ हजार चित्रपट पाहायला मिळणार असल्याचा दावाही कंपनीनं केला आहे.

ग्राहकांना BSNL Cinema Plus service देण्यासाठी कंपनीनं YuppTV सोबत करार केला आहे.

याद्वारे ग्राहकांना SonyLIV Special, Voot Select, YuppTV प्रिमियम आणि Zee5 प्रिमिअमचा अॅक्सेस मिळणार आहे.

ही सेवा ग्राकांना YuppTV स्कोप द्वारे उपलब्ध करून दिली जाईल. याद्वारे एका सबस्क्रिप्शनमध्येच अनेक OTT प्लॅटफॉर्म्सचा अॅक्सेस देण्यात येतो.

कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून हा प्लॅन खरेदी करता येऊ शकतो. BSNL Cinema Plus service चा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना वेब कंटेंट त्यांच्या कम्प्युटर, मोबाईल आणि स्मार्ट टीव्हीवरही पाहता येणार आहे.

यापूर्वी रिलायन्स जिओ आणि एअरटेलनंदेखील अशी सुविधा सुरू केली आहे.