मस्तच! फक्त १९७ रुपयांत मिळणार ३६० जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग; पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 11:59 AM2021-04-06T11:59:15+5:302021-04-06T12:03:40+5:30

BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्रीपेड प्लान आणले आहेत. मात्र, हा प्लान आणण्यापूर्वी कंपनीकडून चार प्लान बंद करण्यात आले आहेत.

टेलिकॉम क्षेत्रात जिओच्या प्रवेशानंतर कंपन्यांची बहुतांश गणिते बदलल्याचे चित्र पाहायला मिळाले. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांमध्ये चढाओढ असल्याचे दिसून येत आहे.

BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्रीपेड प्लान आणले आहेत. मात्र, हा प्लान आणण्यापूर्वी कंपनीकडून चार प्लान बंद करण्यात आले आहेत. (bsnl introduced 197 prepaid plan)

BSNL ने ग्राहकांसाठी १९७ रुपयांचा प्रीपेड प्लान लाँच केला आहे. तर काही सध्याच्या प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे. तर काही सध्याच्या प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे.

BSNL च्या १९७ रुपयांच्या प्लानमध्ये सर्व युझर्सना दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे. यानंतर रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर 80Kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरता येऊ शकते.

याशिवाय, BSNL च्या या प्लानमध्ये रोज १०० SMS मिळू शकते. या प्लानमध्ये युझर्संना Zing Music अॅपचे फ्री अॅक्सेस मिळू शकणार आहे. याशिवाय या प्लानमध्ये तुम्हाला १८० दिवसांची वैधता मिळते.

या नवीन प्लानला लाँच केल्याशिवाय बीएसएनएलने काही आपल्या प्लानला बंद सुद्धा केले आहे. BSNL ने ४९ रुपये, १०९ रुपये, ९९८ रुपये, आणि १०९८ रुपयांचे प्लान बंद केले आहेत. जे ग्राहक या प्लानचा वापर करीत आहेत. ते वैधता संपेपर्यंत याला वापरू शकतात.

BSNL ने या प्रीपेड प्लान्सला बंद करण्यासोबतच याच्या ३६५ रुपयांच्या प्लानची किंमत वाढवली आहे. आता या प्लानसाठी ग्राहकांना ३९७ रुपये द्यावे लागतील.

BSNL च्या या प्लानमध्ये ग्राहकांना ६० दिवसांची वैधता सोबत फ्री कॉलिंग सोबत रोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळू शकते.

BSNL ने ४८५ रुपयांचा प्रीपेड प्लान लाँच केला आहे. या प्लानमध्ये लोकल आणि एसटीडी कॉलिंग सोबत रोज १०० एसएमएस ची सुविधा मिळते.

याशिवाय, BSNL च्या या प्लानमध्ये दररोज रोज १.५ जीबी डेटा मिळतो. यासोबतच सब्सक्रायबर्सला फ्री कॉलर ट्यूनची सुविधा मिळते. याची वैधता ९० दिवसांची आहे.