BSNL धमाकेदार प्लॅन, कमी किमतीत मिळेल रोज 2GB डेटा; वैधता 110 दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 04:06 PM2022-02-11T16:06:51+5:302022-02-11T16:11:49+5:30

Jio, Airtel आणि VI ने त्यांच्या प्लॅनच्या किमती वाढवल्यानंतर BSNL चे कमी किमतीचे प्लॅन लोकांना आकर्षित करत आहे.

मागील काही दिवसांत BSNL ने अनेक प्रीपेड प्लॅन लॉन्च केले आहेत. Jio, Airtel आणि Vodafone Idea ने त्यांच्या प्लॅनच्या किमती वाढवल्यानंतर BSNL चे कमी किमतीचे प्लॅन लोकांना आकर्षित करत आहे.

BSNL ने आता त्यांचा आणखी एक नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. 110 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये यूझरला दररोज 2GB डेटासह बऱ्याच सुविधा मिळतात.

BSNL च्या 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये 110 दिवसांची वैधता आणि दररोज 2GB डेटा मिळतो. म्हणजेच यासंपूर्म प्लॅनमध्ये एकूण 220 GB डेटा देण्यात आला आहे.

यासोबत प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, दररोज 100 एसएमएस आणि विनामूल्य Zing म्युझिकचे सदस्यत्व आहे.

बीएसएनएल सेल्फ केअर अॅप आणि बीएसएनएल रिचार्ज पोर्टलद्वारे ग्राहकांना हा 666 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन अॅक्टीव्हेट करता येईल.

विशेष म्हणजे जिओच्या 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता आणि दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो, तर एअरटेलच्या 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये 77 दिवसांची वैधता आणि 1.5 जीबी/दिवस डेटा मिळतो.

Vi च्या 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये 77 दिवसांची वैधता आणि दररोज 1.5 GB डेटा मिळतो. बीएसएनएलचा हा 666 रुपयांचा प्लॅन तिन्ही प्लॅनपेक्षा चांगला आहे.