रोज ५ रूपयांमध्ये ८० दिवस नो टेन्शन, मिळतेय जबरदस्त व्हॅलिडिटी; Airtel-Vi चे प्लॅन्सदेखील फेल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 08:25 PM2022-06-22T20:25:33+5:302022-06-22T20:29:15+5:30

कंपनी अनेक परवडणारे प्लॅन्स ऑफर करत आहे.

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL असे अनेक प्लॅन्स ऑफर करते, जे खाजगी कंपन्यांपेक्षा चांगले फायदे देखील देतात. तसेच, BSNL ही अशीच एक टेल्को म्हणून ओळखली जाते जी भारतातील सर्वात परवडणारी टॅरिफ ऑफर करते.

बीएसएनएलदेखील असे काही प्लॅन्स ऑफर करत आहे, जे त्याच किंमतीत अन्य खासगी कंपन्यांकडूनही ऑफर करण्यात येत आहेत. जरी किंमत सारखीच असली तरी त्यात मिळणारे बेनिफिट्स हे अन्य कंपन्यांच्या तुलनेत अधिक आहेत.

BSNL 80 दिवसांच्या वैधतेसह 399 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ऑफर करते. परवडणाऱ्या किमतीत दीर्घ वैधता असलेला प्लॅन शोधत असलेल्या व्यक्तीसाठी हा एक चांगला पर्याय आहे. या प्लॅनसह, ग्राहकांना दररोज 1GB डेटा मिळतो, त्यानंतर स्पीड 80 Kbps पर्यंत कमी केला जातो.

याशिवाय प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत. बीएसएनएल ट्यून्स आणि लोकधुन कन्टेन्टदेखील प्लॅनमध्ये विनामूल्य उपलब्ध आहे.

भारती एअरटेल 28 दिवसांच्या वैधतेसह 399 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ऑफर करते. प्लॅनमध्ये, ग्राहकांना अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि दररोज 2.5GB डेटा सोबत Airtel Thanks चे फायदे मिळतात. या प्लॅनशिवाय फायद्यांमध्ये तीन महिन्यांसाठी Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शनचा समावेश आहे.

Vodafone Idea देखील वर नमूद केलेल्या Airtel प्लॅनप्रमाणेच फायदे देते, म्हणजेच व्होडाफोन आयडियाचा 399 रुपयांचा प्लॅन देखील 28 दिवसांची वैधता देते. परंतु येथे एअरटेल आणि व्ही प्लॅनमधील फरक फक्त अतिरिक्त फायदे आहेत.

Vi चा हा प्रीपेड हिरो अनलिमिटेड बेनिफिट्स आणि तीन महिन्यांसाठी Disney+ Hotstar मोबाईलचे मोफत OTT सबस्क्रिप्शन, Vi Movies आणि TV VIP ऍक्सेससह येतो. Vi Hero Unlimited बेनिफिट्समध्ये तीन गोष्टींचा समावेश होतो - वीकेंड डेटा रोलओव्हर, डेटा डिलाइट्स आणि बिंज ऑल नाइट. Vi च्या या अतिरिक्त बेनिफिट्सची कोणत्याही खाजगी टेलिकॉम कंपनीशी तुलना होऊ शकत नाही.

तुम्ही येथे सर्व प्लॅन पाहिल्यास, तुम्हाला समजेल की BSNL चा प्लॅन दीर्घ वैधतेसह येतो, तर खाजगी दूरसंचार कंपन्या प्रमुख OTT लाभ आणि अधिक दैनंदिन डेटासह 399 रुपयांची कमी वैधता असलेले प्लॅन्स ऑफर करतात.