BSNL Rupees 47 prepaid plan launched on a promotional basis till March here is what it offers
आला सर्वात स्वस्त प्लॅन, केवळ ४७ रूपयांत मिळणार १४ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 02:51 PM2021-02-25T14:51:39+5:302021-02-25T14:57:37+5:30Join usJoin usNext जाणून घ्या काय आहेत ऑफर्स सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलनं सर्वात स्वस्त प्रीपेड मोबाईल प्लॅन लाँच केला आहे. कंपनीनं नुकतानच ४७ रूपयांचा एक नवा फर्स्ट रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये जिओ, एअरटेल, व्होडाफोनच्या तुलनेत अधिक ऑफर्स आणि बेनिफिट्स मिळत आहेत. भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांचा सुरूवातीचा प्लॅन ९७ रूपयांपासून सुरू होतो. तर दुसरीकडे जिओ प्राईम सबस्क्रिप्शनसाठी ९९ रूपये ग्राहकांकडून आकारते. बीएसएनएलच्या या प्लॅनसोबत १४ जीबी हायस्पीड टेडा आणि फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. तसंच यासोबत कंपनी मोफत ४जी सिमकार्डही देत आहे. ग्राहकांना ३१ मार्च २०२१ पर्यंत या प्लॅनचा लाभ घेता येणार आहे. जर कंपनीनं प्रमोशनल ऑफर पुढेही सुरू ठेवली तर ग्राहकांना याचा पुढेही लाभ घेता येईल. परंतु एक महत्त्वाची बाब म्हणजे सध्या हा प्लॅन केवळ चेन्नई आणि तामिळनाडू या दोन सर्कलसाठी उपलब्ध आहे. अन्य सर्कलमध्ये लवकरच हे प्लॅन लाँच केले जातील. ४७ रूपयांच्या या प्लॅनसोबत ग्राहकांना १०० दिवसांची इनिशिअल प्लॅन व्हॅलिडिटी देण्यात येते. १०० दिवसांची सिम व्हॅलिडिटी संपल्यानंतर ग्राहकांना सिमकार्ड अॅक्टिव्हेट ठेवण्यासाठी एक रिचार्ज करावं लागतं. या प्लॅनसोबत ग्राहकांना रोमिंग आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिलतो. तंच १४ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएसही देण्यात येतात. हा प्लॅन २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह मिळतो. सध्या केवळ ४७ रूपयांचा रिचार्ज करून या कॉम्बो प्लॅनचा लाभ घेता येऊ शकतो. टॅग्स :बीएसएनएलइंटरनेटमोबाइलBSNLInternetMobile