BSNL : बीएसएनएलचा परवडणारा प्लान; रोज २ जीबी डेटा ; अनलिमिटेड कॉलिंग, दररोजचा केवळ ७ रुपयांचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 01:41 PM2024-10-14T13:41:24+5:302024-10-14T13:47:58+5:30

BSNL आपल्या ग्राहकांसाठी नवीन योजना लाँच करत असते.

काही महिन्यापूर्वीच देशातील टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. यामुळे आता ग्राहकांच्या खिशाला फटका बसला आहे. तर दुसरीकडे बीएसएनएल कंपनीने नवीन प्लान लाँच केले आहेत.

यामुळे अनेक ग्राहकांनी बीएसएनएलमध्ये सीम पोर्ट करण्यावर भर दिला आहे. स्वस्त रिचार्जसाठी सिम पोर्ट केलेले लाखो युझर्स आहेत. एकीकडे Jio-Airtel सारख्या कंपन्यांचे प्लॅन खूप महाग आहेत, तर दुसरीकडे BSNL आहे जे या दोघांपेक्षा स्वस्त प्लान ऑफर करत आहे.

जर तुम्ही BSNL चा स्वस्त प्लान शोधत असाल तर तुमच्यासाठी हा नवीन प्लान फायद्याचा आहे. यात 2GB डेटा आणि ७ रुपयांपेक्षा कमी मध्ये अमर्यादित कॉलिंग सारखे फायदे मिळतात.

सरकारी टेलिकॉम कंपनी १०५ दिवसांच्या वैधतेसाठी परवडणारा प्लान देत आहे. यामध्ये यूजर्सला या दररोज 2GB डेटा मिळतो. यासोबतच 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे.

यामध्ये एकूण 210 GB डेटा रोलआउट करण्यात आला आहे. त्याची किंमत ६६६ रुपये आहे. याला BSNL चा ‘सिक्सर प्लान’ असेही म्हणतात. कंपनीने हा प्लान पहिल्यांदा २०१७ मध्ये आणला होता.

Jio आणि Airtel च्या तुलनेत, BSNL चा हा प्लान खूप कमी किमतीत या फायद्यांसह आहे, हा प्लान तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीच्या वैधतेसह उपलब्ध आहे.

BSNL कंपनीचा १०८ रुपयांचा प्लान देखील आहे, हा प्लान सिम सुरू ठेवण्यासाठी चांगला आहे. यामध्ये दररोज १ जीबी डेटा दिला जातो.

बीएसएनएल आपल्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर पूर्ण भर देत आहे. कंपनीने पुढील एका वर्षात 5G आणि 4G कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर काम सुरू केला आहे.

कंपनीने एक लाख मोबाइल टॉवर्सना 4G सेवेसह सुसज्ज करून पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यावर भर दिला आहे.

याशिवाय गेल्या काही महिन्यांत कंपनीच्या ग्राहकांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. तर इतर कंपन्यांचे ग्राहक या काळात कमी झाले आहेत.