Budget 2019: ...तेव्हा मनमोहन सिंह यांनी खास शैलीत ऐकवली होती शायरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 04:24 PM2019-01-31T16:24:42+5:302019-01-31T16:29:32+5:30

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार 1 फेब्रुवारीला आपला कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. नव्या सरकारला आपल्या धोरणांनुसार अर्थसंकल्प सादर करता यावा, यासाठी शेवटचा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प म्हणून मांडला जातो. दरम्यान, आधीच्या अर्थसंकल्पावेळी संसदेत अर्थमंत्र्यांनी शेरो-शायरी करत अर्थसंकल्प सादर केला होता.

राजीव गांधी 1987 मध्ये देशाचे पंतप्रधान होते. तसेच, त्यांच्याकडे अर्थमंत्री पदाची जबाबदारी होती. 1987-88 मध्ये राजीव गांधी यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी सिगरेटवर जास्त कर आकारला होता. तेव्हा मजेत म्हणाले होते, 'मला जास्त महसूल गोळा करायचा आहे. त्यासाठी मला अर्थमंत्र्यांचा भरोसा असलेल्या मित्रांना आणि आरोग्यमंत्र्यांच्या शत्रूंची मदत घ्यावी लागणार आहे.'

मनमोहन सिंह 1991 मध्ये अर्थमंत्री होते. त्यांना आर्थिक उदारीकरण नीतीचे जनक म्हटले जाते. 1991 मध्ये संसदेत अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी भाषणात प्रसिद्ध शायर इकबाल यांची शायरी ऐकवली होती. ते म्हणाले, 'यूनान-ओ-मिस्र-रोम सब मिट गए जहां से, अब तक मगर है बाकी, नाम-ओ-निशा हमारा.'

1997 मध्ये अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी पी. चिदंबरम यांनी तमीळ कवी तिरुवल्लूवर यांच्या कवितेतील ओळी वाचल्या होत्या. ते म्हणाले होते, 'इदिप्परई इल्लाथा इमारा मन्नान केदुप्पार इलानुअम केदुम (जे खरे सांगतात, अशा लोकांवर जो राजा विश्वास ठेवत नाही, त्यावर लक्ष ठेवा. त्याचे शत्रु झाला नाहीत तरीही त्याचा नाश होऊ शकतो).'

यशवंत सिन्हा 2002 मध्ये अर्थमंत्री असताना त्यांनी बॉलिवूडची स्तुती केली होती. अर्थसंकल्प सादर करताना ते म्हणाले, गेल्या तीन वर्षात दर वर्षी चित्रपटांची निर्यात जवळपास दुप्पट झाली आहे. आता वेळ आली आहे की, आपल्या अशी अर्थ व्यवस्था करावी लागेल. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रात जास्त खुशी देऊन त्यांचे दुख दूर करू शकू.

सध्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सुद्धआ 2017 मध्ये शेरो-शायरी करत अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी त्यांनी कवितेच्या माध्यमातून नोटांबदीला घाबरु नका असे आवाहन केले होते. ते म्हणाले होते, ' या घडीला तुम्ही घाबरुन थांबू नका, जी गोष्ट नवीन आहेत तिला तुम्ही स्वीकारा. नवीन मार्गावर चालण्यास का घाबरत आहात, आम्ही पुढे-पुढे जात आहोत. आपणही या.'