Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या गुरुवारी संसदेत यंदाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सर्वांत पहिला अर्थसंकल्प १८६० साली मांडण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत अर्थसंकल्प सादर करण्याच्या पद्धतीत अनेक बदल करण्यात आले आहेत. एक काळ असा होता की, बजेट ब्रीफकेसमधून आणले जात असे. २०१९नंतर बजेट पेपरलेस बनले आहे. संसदेत सादर करण्यासाठी आता बजेट एका टॅबमधून आणले जाते.