Union Budget 2024: यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारनं कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष दिलं? वाचा सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 01:48 PM2024-07-23T13:48:36+5:302024-07-23T14:21:50+5:30

Union Budget 2024: सरकार कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष देत आहे, याबाबत जाणून घ्या...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज २३ जुलै रोजी केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी अशा सर्व गोष्टींचा उल्लेख केला, ज्यांवर सरकार विशेष लक्ष देत आहे. सरकार कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष देत आहे, याबाबत जाणून घ्या...

आयकर कायदा १९६१ चा सर्वसमावेशक आढावा घेतला जाईल, ज्यामुळे वाद आणि खटले कमी होतील. हे ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे.

कॅन्सरवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तीन औषधांना मूलभूत सीमा शुल्कातून सूट दिली जाईल.

२०२४-२५ मध्ये वित्तीय तूट जीडीपीच्या ४.९ टक्के असण्याचा अंदाज आहे. तूट ४.५ टक्क्याच्या खाली आणण्याचं लक्ष्य आहे.

सोनं आणि चांदीवरील सीमाशुल्क ६ टक्के आणि प्लॅटिनमवरील ६.५ टक्क्यांपर्यंत कमी केले जाईल.

मूलभूत संशोधन आणि प्रोटोटाइप विकासासाठी संशोधन राष्ट्रीय संशोधन निधीची स्थापना केली जाईल.

मोबाईल फोन, मोबाईल पीसीबी आणि मोबाईल चार्जरवरील बीसीडी १५ टक्क्यांपर्यंत कमी होईल.

अंतराळ अर्थव्यवस्थेसाठी सरकारने १००० कोटी रुपयांचा व्हेंचर कॅपिटल फंड स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

लोकसंख्या वाढीमुळे पात्र ठरलेल्या अशा ग्रामीण वस्त्यांमध्ये पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या चौथ्या टप्प्याचा शुभारंभ करणार आहेत.

२५ महत्वपूर्ण खनिजांवर सीमाशुल्कातून सूट दिली जाईल आणि त्यापैकी दोन खनिजांवर बीसीडी कमी केली जाईल.

पावसामुळे येणाऱ्या पुराचा सामना करण्यासाठी सरकार बिहारला ११,५०० कोटी रुपये देणार आहे.

शहरी घरांसाठी २ लाख कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. पीएमएवाय अर्बन हाऊसिंग २.० अंतर्गत १० लाख कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पातून लोकांच्या घरांच्या गरजा पूर्ण केल्या जातील, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, केंद्र सरकार २ लाख कोटी रुपयांची मदत करेल आणि या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी सवलतीच्या दरांची ऑफर दिली जाईल.