बम्पर परतावा! ₹18 चा शेअर वाढून पोहोचला ₹1500 वर, केवळ 3 वर्षांत 1 लाखाचे झाले 83 लाख!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 08:39 PM2023-03-18T20:39:20+5:302023-03-18T20:47:00+5:30

ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीत 3 वर्षांसाठी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली, त्यांची रक्कम आता 83 लाख रुपयांपेक्षाही अधिक झाले असेल.

शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यांनी कोरोनानंतर आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. असाच एक शेअर आहे आदित्य व्हिजन. गेल्या वर्षभरात या शेअरच्या किमतीत 100 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या तीन वर्षांत तब्बल 8000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीत 3 वर्षांसाठी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली, त्यांची रक्कम आता 83 लाख रुपयांपेक्षाही अधिक झाले असेल.

केव्हा आणि किती परतावा दिला? - आदित्य व्हिजन या स्मॉल-कॅप कंपनीने आपल्या भागधारकांना बम्पर परतावा दिला आहे. हा स्मॉल-कॅप मल्टीबॅगर स्टॉक गेल्या सहा महिन्यांत ₹1385 रुपयांवरून वाढून जवळपास ₹1500 पर्यंत पोहोचला आहे. हे अंदाजे 8 टक्के परतावा दर्शवते.

गेल्या वर्षभरात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या कालावधीतील शेअरच्या किमतीसंदर्भात बोलायचे झाल्यास, हा शेअर सुमारे ₹710 वरून ₹1500 पर्यंत पोहोचला आहे. हे 110 टक्के एवढा जबरदस्त परतावा दर्शवते.

याच बरोबर, हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या दोन वर्षांत सुमारे ₹190 वरून ₹1500 प्रति शेअरवर पोहोचला आहे. हा जवळपास 700 टक्के एवढा परतावा आहे.

तसेच, गेल्या 3 वर्षांत, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 8,250 टक्के एवढा परतावा दिला आहे. या कालावधीतील शेअर प्राइससंदर्भात बोलायचे झाल्यास, हा शेअर ₹18 वरून तब्बल ₹1500 रुपयांवर पोहोचला आहे.

गुंतवणुकीवर परिणाम - आदित्य व्हिजन या बिहारमधील कंपनीत ज्या गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवून काही दिवस वाट बघितली ते आज मालामाल झाले आहेत. जर एखाद्या गुंतवणूकदाराने सुमारे तीन वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, त्याच्या 1 लाख रुपयांचे आज 83.50 लाख रुपये झाले असेत.

आदित्य व्हिजनच्या शेअरसंदर्भात बोलायचे झाल्यास, या शेअरचा 52-आठवड्यांतील अच्चांक ₹1845 प्रति शेअर एवढा आहे. तसेच निचांक 640.30 प्रति शेअर एवढा आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)