रतन टाटांना विकण्यात आली आणखी एक सरकारी कंपनी, नशीब बदललं; 2 वर्षांनंतर सुरू होण्यास तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 06:54 PM2022-07-06T18:54:30+5:302022-07-06T19:04:56+5:30

हा प्लँट 30 मार्च, 2020 म्हणजेच 2 वर्षांपासून बंद आहे. मात्र, आता या कंपनीचे नशीब बदलू लागले आहे.

खासगी करणाला मोठा विरोध होत असतानाही सरकारने आणखी एक कंपनी दिग्गज बिझनेसमन रतन टाटा यांना सोपवली आहे. खरे तर, ही कंपनी तोट्यात सुरू होती. एवढेच नाही, तर हा प्लँट 30 मार्च, 2020 म्हणजेच 2 वर्षांपासून बंद आहे. मात्र, आता या कंपनीचे नशीब बदलू लागले आहे.

सरकारी कंपनीचं नशीब खुललं! जवळपास दोन वर्षांपासून बंद असलेली सरकारी कंपनी निलाचल इस्पात निगम लिमिटेड (NINL) रतन टाटांकडे जाताच, तिचे नशीब बदलू लागले आहे. एवढेच नाही, तर निलाचल इस्पातचे कारखाने पुढील तीन महिन्यांत पुन्हा सुरू करण्याचे लक्ष्य आहे, असे टाटा स्टीलचे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर टीव्ही नरेंद्रन यांनी म्हटले आहे. अर्थात ही कंपनी आता लवकरच सुरू होणार आहे.

दोन वर्षांनंतर सुरू होणार काम - “आम्ही विद्यमान कर्मचार्‍यांच्या सोबतीने काम करण्यास आणि जवळपास दोन वर्षांपासून बंद असलेला कारखाना पुन्हा एकदा सुरू करण्यास तयार आहोत. यानुसार, पुढील तीन महिन्यांत उत्पादन सुरू होण्याची आणि पुढील 12 महिन्यांत स्थापित क्षमता गाठण्याची अपेक्षा आहे," असे मॅनेजिंग डायरेक्टर टीव्ही नरेंद्रन यांनी म्हटले आहे.

याच बोरबर, टाटा स्टील एनआयएनएलची क्षमता वाढवून ती 50 लाख टनपर्यंत करण्यासाठी आवश्यक मंजुरी मिळविण्याच्या दृष्टीनेही पावले उचलेले जातील असेही नरेंद्रन यांनी म्हटले आहे.

टाटांनी जिंकली होती बोली - ओडिशा येथील नीलाचल इस्पात निगम लिमिटेड (NINL) कंपनी, टाटा समूहाच्या एका फर्मला सोपवण्यात आली आहे. एक अधिकाऱ्या दिलेल्या माहितीनुसार, टाटा स्टीलच्या टाटा स्टील लॉन्ग प्रोडक्ट्सने (टीएसएलपी) याच वर्षी जानेवारी महिन्यात 12,100 कोटी रुपये एवढ्या एंटरप्राइझ किंमतीत एनआयएनएलचा 93.71 टक्के भाग मिळण्यासंदर्भातील बोली जिंकली आहे.

विशेष म्हणजे टाटा कंपनीने, जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेड, नलवा स्टील अँड पॉवर लिमिटेड आणि जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड या समूहाला मागे टाकत हे यश मिळवले आहे.

कंपनीवर मोठे कर्ज - एनआयएनएल कंपनीचा कलिंगनगर, ओडिशा येथे 1.1 एमटी क्षमतेचा एक इंटिग्रेटेड स्टील प्लांट आहे. ही सरकारी कंपनी अत्यंत तोट्यात सुरू आहे.

या कंपनीवर गेल्यावर्षी 31 मार्चला 6,600 कोटी रुपयांहूनही अधिकचे कर्ज होते. 31 मार्च 2021 पर्यंत कंपनीची संपत्ती निगेटिव्ह 3,487 कोटी रुपये आणि संचित घाटा 4,228 कोटी रुपये एवढा होता.