Business Idea : घरबसल्या १ लाख रुपये कमावण्याचा फंडा; वर्षभर चालणार काम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 03:16 PM2022-04-14T15:16:21+5:302022-04-14T15:22:39+5:30

Business Idea : भारतात या प्रोडक्टला खुप मोठी मागणी आहे. पाहा कोणता आहे हा व्यवसाय.

Business Idea : प्रत्येकजण कधी ना कधी व्यवसायात आपला हात आजमावण्याचा विचार करतो. कधी पैशाची अडचण येते, तर कधी व्यवसायाची कल्पना नसल्यामुळे काम होत नाही. जर आपण दैनंदिन गोष्टींचा नीट विचार केला तर अशा अनेक व्यवसाय कल्पना आपल्या आजूबाजूलाही आपल्याला दिसू शकतात.

असेही काही व्यवसाय आहेत ते सुरू सुरू करण्यासाठी अधिक पैशांची गरज भासत नाही आणि चांगली कमाई करण्याच्या संधी आहेत. असे अनेक उद्योग सुरू करतानाही सरकारकडून मदत मिळते. पेपर नॅपकिन मॅन्युफॅक्चरिंग युनिटची (Paper Napkin Manufacturing Unit) सुरू करणे ही या व्यवसाय कल्पनांपैकी एक आहे.

युरोपिय देशांसह ज्या देशांमध्ये थंड वातावरण असतं अशा देशांमध्ये मोठ्या प्रमाणात टिश्यू पेपर (Tissue Paper) वापरले जातात. कोरोना महासाथीच्या काळात युरोपीयन देशआंमध्ये जेव्हा लॉकडाऊन लावण्यात आला येत होता, तेव्हा त्या देशांमध्येही लोकांनी पॅनिक बाईंग सुरू केलं होतं.

त्यावेळी लोकांनी पॅनिक बाईंग केलेली गोष्ट म्हणजे कोणतंही रेशन किंवा अन्नधान्याचं सामान नव्हतं. तर ती टिश्यू पेपरसाठी करण्यात आली होती. त्या ठिकाणी सुपरमार्केट आणि रिटेल स्टोअर्समध्ये एक दोन दोन दिवसात टिश्यू पेपरचा स्टॉक पूर्णपणे संपला होता.

भारतात टिश्यू पेपरचा खप युरोपीय देशांइतका जास्त नसला तरी इथेही त्याची मोठी बाजारपेठ आहे. भारतात टिश्यू पेपर म्हणजेच नॅपकिनचा भरपूर वापर आहे आणि त्याची बाजारपेठ सतत वाढत आहे. चांगली गोष्ट म्हणजे ब्रँडेड नॅपकिन्ससोबतच भारतीय बाजारपेठेत स्थानिक प्रोडक्ट्सचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो.

या कारणास्तव, नॅपकिन पेपर प्लांटची स्थापना करणे फायदेशीर ठरू शकते आणि तुम्ही तुमच्या जवळपास त्याची विक्री करून लाखो कमवू शकता. त्याचा प्लांट कसा सुरू करता येईल, त्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल, सरकारकडून कोणती मदत मिळू शकते आणि त्यातून तुम्हाला किती नफा होऊ शकतो हे जाणून घेऊया...

इंडियामार्टवर उपस्थित असलेल्या पुरवठादारांच्या मते, नॅपकिन पेपर बनविण्याचे मशीन ५ लाख रुपयांपासून सुरू होते. सेमी ऑटोमॅटिक मशीन घेतल्यास ५ ते ६ लाख रुपयांना मिळेल. हे मशीन तासाला चार ते पाच इंचाच्या १०० ते ५०० नॅपकिन पिसेस बनवू शकते. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करायचा असेल, तर उच्च क्षमतेचे पूर्ण स्वयंचलित मशीन १० ते ११ लाख रुपयांना उपलब्ध आहे. त्याची क्षमता प्रति तास ५,५०० रोल बनवण्याची आहे.

या व्यवसायासाठी तुम्ही स्वतः ३.५० लाख रुपये उभे केले तर तुम्हाला सरकारी मुद्रा योजनेंतर्गत (Mudra Scheme) कर्ज देखील मिळू शकते. तुमच्या जवळ इतके पैसे असल्यास, तुम्ही मुद्रा योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज केल्यास, तुम्हाला ३.१० लाख रुपयांचे टर्म लोन आणि ५.३० लाख रुपयांचे वर्किंग कॅपिटल लोन (Working Capital Loan) मिळू शकते. अशाप्रकारे, तुम्हाला सुमारे १२ लाख रुपयांची मदत मिळेल आणि याद्वारे तुम्ही योग्यरित्या हा व्यवसाय सुरू करू शकता.

एखादा छोटा प्लांटही सुरू करून तुम्ही सहजरित्या वर्षाला १.५० लाख किलोपर्यंत नॅपकिन पेपरचं प्रोडक्शन (Napkin Paper Production) सुरू करू शकता. बाजारात ६५ रुपये किलो दराने नॅपकिन पेपर सहज विकता येतो. अशा प्रकारे, आपण एका वर्षात सुमारे १ कोटी रुपयांची उलाढाल सहज साध्य करू शकता. कच्चा माल, मशिनचा खर्च आणि कर्जाचे हप्ते काढूनही पहिल्या वर्षीच या व्यवसायातून १०-१२ लाख रुपये वाचवता येतात.