Business Idea: केवळ एक लाख रुपयांत सुरू करा हा सुपरहिट बिझनेस, दर महिन्याला होईल ८ लाख रुपयांपर्यंत कमाई By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 04:55 PM 2022-04-24T16:55:47+5:30 2022-04-24T16:58:39+5:30
Business Idea: जर तुम्हाला दररोजच्या नोकमीमुळे कंटाळा आला असेल आणि तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. हा व्यवसाय आहे. काकडीच्या शेतीचा. हा व्यवसाय तुम्ही कधी आणि कसा सुरू करू शकता याची माहिती पुढील प्रमाणे जर तुम्हाला दररोजच्या नोकमीमुळे कंटाळा आला असेल आणि तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. हा व्यवसाय आहे. काकडीच्या शेतीचा. हा व्यवसाय तुम्ही कधी आणि कसा सुरू करू शकता याची माहिती पुढील प्रमाणे
जर तुम्हाला बिझनेसमधून अल्पावधीत बंपर फायदा कमवायचा असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. त्यासाठी तुम्हाला सरकारकडून सब्सिडीसुद्धा मिळेल. या बिझनेसमध्ये तुम्ही सुमारे एक लाख रुपये गुंतवून दरमहा ८ लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता.
काकडीच्या शेतीमधबन नफा कमावण्यासाठी तुम्हाला खूप वाट पाहण्याची आवश्यकता नाही. काकडीची लागवड केल्यावर चार महिन्यांनंतर तुम्ही आठ लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता. त्यासाठी नव्या पद्धतीची शेती करण्याची गरज आहे. उत्तर प्रदेशमधील एका शेतकऱ्याने नेदरलँड्समधून आणलेल्या खास प्रकारच्या काकडीच्या बियाण्याची लागवड करून नफा कमावला आहे. या व्यवसायामध्ये फायदा आहे. तुम्ही सर्वप्रथम या व्यवसायासाठी सरकारकडून सब्सिडी घेऊ शकता.
काकडी लागून ती तयार होण्यासाठी ६० ते ८० दिवसांचा कालावधी लागतो. पावसाळ्यामध्ये काकडीची शेती अधिक होते. काकडीच्या शेतीसाठी जमिनीचा पीएच ५.५ ते ६.८ पर्यंत असणे उत्तम मानले जाते. काकडीची शेती नदी आणि तलावाच्या शेजारीही करता येऊ शकते.
त्यासाठी तुम्ही सर्वप्रथम शेडनेट हाऊस तयार केले पाहिजे. उत्तर प्रदेशमधील शेतकरी दुर्गा प्रसाद यांनी या शेतीसाठी शेतामध्येच शेडनेट तयार केला आहे. त्यानंतर त्यांनी नेदरलँडहून ७२ हजार रुपयांचे बियाणे मागवले. बियाणे लावल्यापासून चार महिन्यांनंतर त्यांनी ८ लाख रुपयांच्या काकड्यांची विक्री केली आहे.
या काकडीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये बिया कमी असतात. त्यामुळे ग्राहकांकडून त्यांना अधिक मागणी असते. त्यामुळेच याची किंमतसुद्धा देशी काकडीपेक्षा अधिक असते. नेदरलँड्समधील बी असलेली की काकडी ४० ते ५० रुपये प्रति किलोच्या हिशेबाने विकली जाते. तसेच तिला वर्षभर मागणी असते.