Business Idea: स्टेशनरीच्या बिझनेसनं होईल तगडी कमाई, बनू शकता कोट्यधीश; पाहा कसा कराल सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 04:19 PM2022-11-27T16:19:18+5:302022-11-27T16:29:04+5:30

Business Idea: अगदी कमी खर्चात स्टेशनरीचा व्यवसाय सुरू करता येतो. स्टेशनरी वस्तूंना मोठी मागणी आहे.

Business Idea: तुम्हाला चांगला व्यवसाय सुरू करायचा आहे का? परंतु कोणत्या गोष्टीचा व्यवसाय सुरू करायचा हे ठरवता येत नाहीये? अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला एक उत्तम बिझनेस आयडिया देत आहोत. हा असा व्यवसाय आहे ज्यामध्ये तुम्हाला 50 टक्क्यांपर्यंत नफा मिळू शकतो.

आम्ही तुम्हाला स्टेशनरी व्यवसायाबद्दल सांगत आहोत. साधारणपणे शाळा, कॉलेजच्या आजूबाजूच्या स्टेशनरीच्या दुकानांवर तुम्ही अनेकदा गर्दी पाहिली असेल. स्टेशनरी वस्तूंना मोठी मागणी आहे. हा व्यवसाय सुरू करून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

पेन पेन्सिल, A4 आकाराचा कागद, नोटपॅड इत्यादी स्टेशनरी वस्तूंच्या अंतर्गत येतात. ग्रीटिंग कार्ड, लग्नपत्रिका, भेटकार्ड इत्यादी स्टेशनरी दुकानातही ठेवता येतात. अशा वस्तू विकून तुम्ही अतिरिक्त पैसेही कमवू शकता.

जर तुम्ही स्टेशनरीचे दुकान उघडणार असाल तर सर्वप्रथम तुम्हाला 'शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट' अंतर्गत नोंदणी करावी लागेल. स्टेशनरी दुकान उघडण्यासाठी 300 ते 400 चौरस मीटर जागा आवश्यक आहे. अगदी कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करता येतो. एक साधं स्टेशनरी दुकान उघडण्यासाठी तुम्हाला सुमारे 50,000 रुपयांपर्यंतची सुरूवातीला गुंतवणूक करावी लागेल.

तुम्ही तुमच्या बजेटनुसार व्यवसायात जास्त पैसे गुंतवू शकता आणि जास्त नफा मिळवू शकता. दुकान उघडण्यासाठी ठिकाण खूप महत्त्वाचे असते. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांजवळ स्टेशनरीची दुकाने उघडा. जर तुम्ही तुमच्या दुकानात ब्रँडेड स्टेशनरी उत्पादने विकली तर तुम्ही 30 ते 40 टक्क्यांपर्यंत बचत करू शकता. त्याच वेळी, लोकल प्रोडक्टवर तुमची कमाई दोन ते तीन पट असेल.

स्टेशनरी दुकानाचे मार्केटिंग आवश्यक आहे. यासाठी तुम्ही तुमच्या दुकानाच्या नावाने पॅम्प्लेट छापून ती वितरीत करू शकता. याशिवाय तुम्ही शाळा, कोचिंग इन्स्टिट्यूट आणि कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना तुमच्या दुकानाबद्दल सांगू शकता. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तुम्ही या व्यवसायाचे मार्केटिंग करू शकता. एवढेच नाही तर होम डिलिव्हरी सुविधा देऊन तुमचा व्यवसाय लवकर वाढू शकतो.