Business Idea : कोणताही हंगाम असो, या प्रोडक्टला असते जबरदस्त मागणी; बिझनेसमधून होईल छप्परफाड कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 08:10 PM2023-04-30T20:10:44+5:302023-04-30T20:31:30+5:30

हा एक असा बिझनेस आहे, ज्याची मागणी कधीच कमी होत नाही. हिवाळा असो की उन्हाळा अथवा पावसाळा...

जर आपण स्वतःचा काही व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात विचार करत असाल, तर आज आम्ही आपल्याला एका खास बिझनेससंदर्भात माहिती देत आहोत. विशेष म्हणजे हा बिझनेस छोटी गुंतवणूक करूनही सुरू केला जाऊ शकतो. हा एक असा बिझनेस आहे, ज्याच्या शिवाय लोकांचा सकाळचा नाश्ता अपूर्ण राहतो. आम्ही आपल्याला पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिटसंदर्भात (Poha Manufacturing Unit) माहिती देत आहोत...

हा एक असा बिझनेस आहे, ज्याची मागणी कधीच कमी होत नाही. हिवाळा असो की उन्हाळा अथवा पावसाळा लोक रोजच मोठ्या चविने पोहे खातात. यामुळे या व्यवसायाला कुठल्याही सिझनचे बंधन नाही.

पोह्याला न्यूट्रिटिव्ह फूड मानले जाते. पोहे प्रामुख्याने सकाळचा नाश्ता म्हणून खाल्ले जातात. खरे तर, पोहे बनवणे आणि पचवणे दोन्हीही सोपे आहे. यामुळेच पोह्यांचे मार्केट झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत आपण पोहे मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करून आपला बिझनेस सुरू करू शकता.

किती खर्च येतो? - खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या (Khadi and Village Industries Commission/KVIC) प्रोजेक्ट रिपोर्टनुसार, पोह्याच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट साठी साधारणपणे 2.43 लाख रुपये एवढा खर्च येतो. यासाठी आपल्याला 90 टक्क्यांपर्यंत कर्जही मिळू शकते. आपण सरकारच्या मुद्रा कर्ज योजनेचाही लाभ घेऊ शकता.

अर्थात, अशा स्थितीत पोहे मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला सुमारे 25,000 रुपयांची व्यवस्था करावी लागेल. महत्वाचे म्हणजे, ग्रामोद्योगांना चालना देण्यासाठी KVIC कडून दरवर्षी कर्ज दिले जाते.

'हे' साहित्य आवश्यक... - हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुमारे 500 चौरस फूट जागा असणे आवश्यक आहे. याशिवाय, पोह्याचे मशीन, भट्टी, पॅकिंग मशीन आणि ड्रमसह लहान वस्तू आवश्यक असतील. KVIC च्या रिपोर्टनुसार, या व्यवसायाच्या सुरुवातीला काही कच्चा माल आणावा, नंतर हळूहळू त्याचे प्रमाण वाढवावे. अशा प्रकारे, आपल्याला अधिक अनुभव येईल आणि व्यवसाय देखील वाढेल.

याच बरोबर KVIC च्या रिपोर्टनुसार, जर आपण प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आणि ग्रामोद्योग रोजगार योजनेंतर्गत कर्जासाठी अर्ज केला, तर आपल्याला जवळपास 90 टक्के कर्ज मिळू शकते. आपणही याचा लाभ घेऊ शकता.

एवढी होई कमाई? - हा प्रोजेक्ट सुरू केल्यानंतर आपल्याला कच्चा माल आणावा लागेल. यासाठी जवळपास 6 लाख रुपये एवढा खर्च येईल. याशिवाय 50,000 रुपये इतरत्र खर्च होतील. अशा प्रकारे सुमारे 1000 क्विंटल पोह्याचे उत्पादन होईल. याला जवळपास 8.60 लाख रुपये एवढा उत्पादन खर्च येईल. आपण हे 1000 क्विंटल पोहे जवळपास 10 लाख रुपयांना विकू शकता. अर्थात यावर आपल्याला जवळपास 1.40 लाख रुपये एवढा नफा मिळू शकतो.