राकेश झुनझुनवाला यांचा फेव्हरिट स्टॉक! 86 रुपयांचा शेअर करू शकतो मालामाल, जाणून घ्या कसे By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2021 09:25 PM 2021-11-20T21:25:11+5:30 2021-11-20T21:41:51+5:30
खरे तर, गेल्या सहा मिहन्यांत बँकिंग शेअर 70 रुपये ते 95 रुपयांदरम्यान आहेत. एवढेच नाही, तर इन्वेस्टर्सना फारसे रिटर्नदेखील (Stock return) मिळालेले नाही. तरीही हे झुनझुनवाला यांचे फेव्हरिट शेअर्स आहेत. शेअर बाजारातील बादशाह राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी एप्रिलपासून ते जून 2021 च्या तिमाहीत फेडरल बँकेत (Federal Bank) अपला वाटा तब्बल 0.40 टक्के वाढवला आहे. यानंतर त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये फेडरल बँकेचे 75 लाख शेअर्स जोडले गेले आहेत. अर्थात बिग बुलला या शेअरवर विश्वास आहे. (Multibagger Stock - 2021)
खरे तर, गेल्या सहा मिहन्यांत बँकिंग शेअर 70 रुपये ते 95 रुपयांदरम्यान आहेत. एवढेच नाही, तर इन्वेस्टर्सना फारसे रिटर्नदेखील (Stock return) मिळालेले नाही. तरीही हे झुनझुनवाला यांचे फेव्हरिट शेअर्स आहेत.
फेडरल बँकेच्या (Bank stock) जुलै 2021 च्या शेअरहोल्डिंगनुसार, बिग बुल यांनी या स्टॉकवर आपला विश्वास कायम ठेवला आहे. तसेच फेडरल बँकेतील आपली हिस्सेदारी कायम ठेवली आहे.
राकेश झुनझुनवाला यांचा होल्डिंग शेअर - राकेश झुनझुनवाला यांच्याकडे असलेला हा स्टॉक Q2FY22 च्या मजबूत नंबर्सनंतर वरच्या दिशेने जाण्याचे संकेत देत आहे. याच बरोबर, शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते, फेडरल बँकेने मजबूत व्यवसाय मोमेन्टम दर्शविली आहे आणि आगामी काळात तिचे शेअर्स मोठी उसळी घेऊ शकतात.
फेडरल बँकेने Q2FY22 साठी मजबूत बिझनेस मोमेन्ट दर्शवली आहे. कारण तिमाही आधारे हिचे अॅडव्हॉन्सेस 3.4 टक्क्यांनी वाढून 1,37,3091 कोटी रुपये झाले आहे.
रिपोर्ट काय सांगतो? रिपोर्टनुसार, तिमाहीच्या आधारे डिपॉझिट 2.5 टक्क्यांच्या वृद्धीसह 1,68,743 कोटी रुपये झाले आहे. तर तिमाहीच्या आधारे CASA रेश्यो 135 बीपीएस सुधारणेसह 36.16 टक्के झाला आहे.
सध्या बिझनेस मोमेन्टममध्ये सुधारणे सोबतच फेडरल बँकेसाठी अॅसेट क्वालिटी आणि क्रेडिट कॉस्टमध्येही घट होण्याची आशा केली जात आहे.
राकेश झुनझुनवाला कोणताही स्टॉक त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करण्यापूर्वी त्याचा संपूर्ण अभ्यास करतात. यामुळेच त्याच्या पोर्टफोलिओमध्ये सामील असलेल्या अनेक स्टॉक्सनी सातत्याने चांगला परतावा दिला आहे.
राकेश झुनझुनवाला हे केवळ अशाच कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात, ज्या मुळात चांगल्या आहेत. झुनझुनवाला यांनी नुकतीच मेटल शेअर्समध्येही भागीदारी वाढवली आहे.
झुनझुनवाला यांनी नुकतीच नाल्को (NALCO) आणि स्टील निर्माता कंपनी सेलमध्ये (SAIL) आपली भागीदारी वाढवली आहे. NALCO ने एका वर्षात 175 टक्के रिटर्न दिले. तर SAILने गेल्या एका वर्षात 185 टक्के रिटर्न दिले आहेत. (टीप - शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणेही आवश्यक आहे.)