Photos: बालपणापासूनची मैत्री अन् आज साखरपुडा; अंबानींच्या सुनेला ट्रेकिंग, स्विमिंग अन् नृत्याची आवड!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 06:06 PM2022-12-29T18:06:52+5:302022-12-29T18:36:58+5:30

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याचा साखरपुडा आज राजस्थानच्या श्रीनाथजी मंदिरात पार पडला.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याचा साखरपुडा आज राजस्थानच्या श्रीनाथजी मंदिरात पार पडला. एंकोर हेल्थकेअरचे सीईओ विरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट (Radhika Merchant) हिच्यासोबत अनंत अंबानीचा साखरपुडा झाला आहे.

सारखपुड्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या अंबानी कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.राजस्थानमधील श्रीनाथजी येथे दोन्ही कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत साखरपुड्याचा विधी पार पडला. अनंत आणि राधिका हे बालपणीचे मित्र आहेत. रिलायन्स ग्रुपने प्रसिद्धीपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे.

राधिका ही उद्योगपती विरेन मर्चंट यांची मुलगी आहे. विरेन मर्चंट हे मुख्यतः कच्छ, गुजरातचे आहे. ते ADF फूड्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक तसेच Encore Healthcare Private Limited चे CEO आणि उपाध्यक्ष आहेत. विरेन यांना राधिका आणि अंजली या दोन मुली आहेत. तर, विरेन मर्चंट यांची पत्नी शैला देखील एक व्यावसायिक आहे आणि त्या एंकोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये संचालकही आहेत. अंजलीही याच कंपनीत संचालक म्हणून काम करते.

राधिका मर्चंटने न्यूयॉर्क विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ती भारतात परतली. भारतात परतल्यानंतर ते इस्प्रवामध्ये उपाध्यक्षपदावर रुजू झाली. ही एक रिअल इस्टेट फर्म आहे, जी लोकांसाठी हॉलिडे होम बनवते. यासोबतच राधिकाला ट्रेकिंग आणि पोहण्याची आवड आहे. ती कॉफीची शौकीन आहे. राधिका आणि अनंत हे एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. राधिका आणि अनंत यांचा एकत्र फोटो 2018 मध्ये व्हायरल झाला होता. फोटोमध्ये दोघेही मॅचिंग ग्रीन आउटफिट्समध्ये दिसत होते.

राधिका ही एक ट्रेंड भारतीय शास्त्रीय नृत्यांगना देखील आहे. जून 2022 मध्ये, अंबानी कुटुंबाने त्यांच्या भावी सून, राधिका मर्चंटसाठी अरंगेत्रम समारंभ आयोजित केला होता. बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्रीही यावेळी उपस्थित होते. या समारंभात राधिकाने शास्त्रीय नृत्य करतानाचे अनेक व्हिडिओ समोर आले होते.

दोन्ही कुटुंबियांच्यावतीने जेवणाचे पहिले निमंत्रण स्थानिक आदिवासी कुटुंबियांना पाठवण्यात आले आहे. श्रीनाथजी मंदीरावर दोन्ही कुटुंबीयांची खूप श्रद्धा आहे. याठिकाणी अन्नकूट महोत्सवाचे आयोजन केले जाते तेव्हा पहिला अधिकार आदिवासींचा असतो. या संपूर्ण कार्यक्रमाला पलना मनोरथ आणि चनवारी मनोरथ असे म्हणतात.

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आजोबा झाले आहेत. त्यांची मुलगी ईशा अंबानीने (Isha Ambani) १९ नोव्हेंबर रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ईशाचे लग्न उद्योगपती अजय आणि स्वाती पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्याशी झाले आहे. ईशाने एक मुलगी आणि एका मुलाला जन्म दिला आहे, त्यावेळी हे कपल अमेरिकेत होते. आता, पहिल्यांदाच ते आपल्या दोन्ही बाळांसह भारतात आले होते.