Car Loan : कार लोनपासून हवीय सुटका? 'या' ३ टीप्स फॉलो करा अन् चिंतामुक्त व्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 12:56 PM2024-10-17T12:56:16+5:302024-10-17T13:03:11+5:30

Car Loan : योग्य आर्थिक नियोजन असेल तर तुम्ही देखील कार लोन वेळेआधी फेडू शकता. यासाठी आधी काही गोष्टी माहिती असण्याची आवश्यकता आहे.

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी म्हणजे खरेदीचा सण मानला जातो. अनेकांचे कार घेण्याचं स्वप्न असतं. मात्र, पैशाअभावी ते पूर्ण होत नाही. अशा परिस्थितीत कार लोन घेऊन कार खरेदी करणे हा उत्तम पर्याय आहे.

यामध्ये तुम्ही दरमहा ईएमआय भरून कार खरेदी करू शकता. जर तुम्हीही या दिवाळीत कार खरेदी करण्याचा विचार करत असाल. पण, कर्जाचा बोजा होईल म्हणून निर्णय घेण्यास मन धजावत नसले. तर आम्ही तुम्हाला कार कर्जाची ईएमआय लवकरात लवकर कशी फेडता येईल ते सांगणार आहोत.

कार लोन घेण्यापूर्वी, तुम्हाला कर्जाची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. कर्जामध्ये व्याज व्यतिरिक्त इतर अनेक शुल्क लावले जातात. सर्व अतिरिक्त शुल्कांची माहिती घ्या, म्हणजे कर्जाची पुर्तता करण्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करता येईल.

अतिरिक्त पेमेंट करणे हा कार लोन EMI मधून लवकर सुटका करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. जेव्हा तुमच्याकडे अतिरिक्त बजेट, बोनस इत्यादीसारखे अतिरिक्त पैसे असतील तेव्हा पहिले कर्जाचे हप्ते भरा. यामुळे तुमच्या कर्जाची रक्कम तर कमी होईलच पण व्याजही कमी होईल.

तुमच्याकडून एकही महिन्याचा EMI चुकू नये यासाठी प्रयत्न करा. हप्ता चुकल्यास त्यावर आणखी दंड भरावा लागेल. यामुळे कर्जाची मुदत देखील वाढू शकते.

टॅग्स :कारबँकcarbank