Car Loan : कार लोन घेताना जरूर करा या चार गोष्टींचं गणित, झटपट संपून जाईल EMI By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2022 12:54 PM 2022-12-10T12:54:04+5:30 2022-12-10T12:57:25+5:30
Car Loan: कार खरेदी करताना पैशांसाठी बहुतांशकरून EMIचा पर्याय निवडला जातो. मात्र या ईएमआयच्या ओझ्यामुळे बहुतांश लोक त्रस्त असतात. जर तुम्हीही कार लोन घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही सांगत असलेल्या चार गोष्टी अवश्य लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला केवळ चांगली डीलच मिळणार नाही तर कुठल्याही अडीअडचणींविना तुमचा ईएमआय संपुष्टात आणणे तुम्हाला शक्य होणार आहे. कार खरेदी करताना पैशांसाठी बहुतांशकरून EMIचा पर्याय निवडला जातो. मात्र या ईएमआयच्या ओझ्यामुळे बहुतांश लोक त्रस्त असतात. जर तुम्हीही कार लोन घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही सांगत असलेल्या चार गोष्टी अवश्य लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला केवळ चांगली डीलच मिळणार नाही तर कुठल्याही अडीअडचणींविना तुमचा ईएमआय संपुष्टात आणणे तुम्हाला शक्य होणार आहे.
बजेटचा विचार करा तुम्हाला कुठली कार घ्यायची आहे याचा निर्णय किती कर्ज मिळेल यावरून नाही तर तुमचे एकूण बजेट आणि खर्चांचा विचार करून घ्या. असे केल्याने तुम्हाला कार लोन सहजपणे मिळेल. तसेच ईएमआयही कुठल्याही अडथळ्यांविना भरता येईल. तुमची ईएमआय ही तुमच्या पगाराच्या १० टक्क्यांहून अधिक नसावी.
एवढ्या वर्षांचं कर्ज घ्या तुमचं कर्ज किती वर्षांचं असलं पाहिजे हासुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कमाल चार वर्षांचं कार लोन हे योग्य मानले जाते. असे केल्याने तुमची दरमहा EMI अधिक असणार नाही. एका गाडीसाठी ४ वर्षे हा अधिक काळ नसतो. त्यामुळे सुरुवातीच्या काही वर्षांमध्येच गाडी पूर्णपणे तुमची होऊन जाईल.
एलिजिबिलिटी आणि ऑफर एलिजिबिलिटीचा अर्थ तुम्ही बँकेकडून कर्ज घेण्याच्या निषकामध्ये बसता कि नाही असा होतो. अनेक बँका तुमची एलिजिबिलिटी आणि मॉडेल पाहून कार लोनसाठी विविध प्लॅन्स ऑफर करतात. अशा परिस्थितीत कर्ज घेताना बँकेकडून बेस्ट डिलबाबत विचारणा करा.
कर्जाची लवकर परतफेड करा तुम्ही तुमचं कर्ज जेवढ्या लवकर ररत कराल तेवढंच व्याज तुम्हाला कमी द्यावं लागेल. त्यामुळे बोनस किंवा कुठल्याही अन्य मार्गांनी पैसे मिळाले तर त्याचा वापर तुम्ही एक्स्ट्रा प्रिंसिपल अमाऊंट परत करण्यासाठी करू शकता.