CarTrade च्या गुंतवणूकदारांना झटका; काही मिनिटांतच कमाईची योजना झाली फेल By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 06:04 PM 2021-08-20T18:04:49+5:30 2021-08-20T18:18:55+5:30
CarTrade Share Market Listing : शेअर बाजारात झाली कमकुवत लिस्टिंग. गुंतवणूकदारांची कमाईची योजना ठरली फेल. ग्राहकांना वाहने खरेदी आणि विक्रीसाठी व्यासपीठ प्रदान करणाऱ्या कार ट्रेड टेक या गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे.
वास्तविक, कंपनीचं शेअर बाजारात कमकुवत लिस्टिंग झालं आहे. जे गुंतवणूकदार या आयपीओद्वारे प्रचंड नफा कमावून कंपनीतून बाहेर पडण्याचा विचार करत होते त्यांच्यासाठी ही वाईट बातमी आहे.
एनएसई इंडेक्सबद्दल सांगायचं झालं तर कंपनीचे शेअर्स १५९९ रूपये प्रति शेअर्सवर लिस्ट झाले. परंतु याची इश्यू प्राईज १६१८ रूपये होती. बीएसई इंडेक्सवर लिस्टिंगनंतर कार ट्रेडचे शेअर्स ६ टक्क्यांनी घसरल्याचं दिसून आलं.
शेअर बाजार बंद होताना कंपनीचा शेअर १५००.१० रूपयांवर बंद झाला. कंपनीच्या मार्केट कॅपिटलबद्दल सांगायचं झालं तर ती ७ हजार कोटी रूपयांपेक्षा कमी आहे.
कार ट्रेड टेकच्या आयपीओला अखेरच्या दिवशी जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला होता. अखेरच्या दिवशी आयपीओ २०.२९ टक्के सबस्क्राईब झाला होता.
११ ऑगस्ट रोजी बंद झालेल्या तीन दिवसीय इश्यूमध्ये २६,३१,७४,८२३ शेअर्ससाठी बोली लावण्यात आली होती. परंतु ऑफरसाठी केवळ १,२९,७२,५५२ शेअर्स होते.
क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स कॅटेगरीसाठी ३५.४५ पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं. जर अन्य बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा ४१ पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांच्या हिस्स्याला २.७५ पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं.
२००९ मध्ये स्थापन झालेली कंपनी वॉरबर्ग पिनकस, तेमासके, जेपी मॉर्गन आणि मार्च कॅपिटलसारख्या मोठ्या गुंतवणूकदारांचं समर्थन आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना जुन्या गाड्यांसह नव्या कार्सची खरेदी विक्रीही उपलब्ध करून देते.
ऑनलाईन कारट्रेड टेकचा आयपीओ ९ ऑगस्ट रोजी खुला झाला होता उघडला आहे. हा आयपीओ ११ ऑगस्ट पर्यंत खुला होता. याचा प्राईज बँड १५८५-१६१८ रूपयांदरम्यान निश्चित करण्यात आला होता.
पहिल्या सत्रातही कमकुवत लिस्टिंग झाल्यानंतर या शेअरची घसरण कायम होती. शेअर बाजाराच्या अखेरच्या सत्रार हा शेअर तब्बल १५००.१० रूपये प्रति शेअर इतका खाली आला होता.