शेजाऱ्याची माहिती द्या, सरकार देईल 5 कोटी रुपयांचे बक्षीस!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: January 14, 2021 01:54 PM2021-01-14T13:54:29+5:302021-01-14T14:07:49+5:30

काळ्या धनाची माहिती देऊन आपण 5 कोटी रुपयांपर्यंत बक्षीस मिळवू शकता. काळे धन आणि टॅक्स चोरीविरोधात सरकारने एक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत ब्लॅक मनी अथवा काळ्या पैशांची माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आयकर विभागाने म्हटले आहे. (फाईल फोटो)

आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोणतीही व्यक्ती काळ्या पैशांशी संबंधित माहिती देऊ शकते. यासाठी आयकर विभागाने ऑनलाईन सेवाही सुरू केली आहे. (फाईल फोटो)

सेंट्रल बोर्ड ऑफ डाइरेक्ट टॅक्सेसने (CBDT) इनकम टॅक्‍स डिपार्टमेंटच्या ई-फायलिंग वेबसाईटवर एक ऑटोमेटेड ई-पोर्टल लॉन्‍च केले आहे. (Central Board of Direct Taxes). (फाईल फोटो)

या ई-पोर्टलवर कुणीही व्यक्ती टॅक्स चोरी अथवा परदेशातील अघोषित संपत्तीबरोबरच बेनामी संपत्तीशी संबंधित ऑनलाईन तक्रार करू शकते. (फाईल फोटो)

या ई-पोर्टलवर मिळणाऱ्या तक्रारींवर संबंधित विभाग तत्‍काळ कारवाई करेल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. (फाईल फोटो)

यासंदर्भात बोलताना अर्थमंत्रालयाने म्हटले आहे, की कर चोरी रोखण्याच्या दृष्टीने आणि ई-गव्हर्नन्सला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हे पाऊल उचलण्यात आले आहे. याअंतर्गत आपण कुण्याही व्यक्ती अथवा कंपनीच्या, देश अथवा देशाबाहेर असलेल्या अवैध संपत्तीसंदर्भात ऑनलाईन तक्रार करून बक्षीस मिळवू शकतात. (फाईल फोटो)

सीबीडीटीने म्हटले आहे, की त्यांच्या ई-फायलिंग पोर्टलवर 12 जानेवारीपासून ‘टॅक्स चोरी अथवा बेनामी संपत्ती होल्डिंगची माहिती देण्यासंबंधातील' लिंक अॅक्टिव्ह केली आहे. यासाठी लोकांना https://www.incometaxindiaefiling.gov.in/ वर जावून File complaint of tax evasion/undisclosed foreign asset/ benami property पैकी एकावर क्लिक करून तक्रार नोंदवायची आहे. (फाईल फोटो)

तक्रारदाराला पॅन अथवा आधार नंबर देण्याची गरज नाही - तक्रारदाराची माहिती गोपनीय ठेवण्याच्या हेतूने त्याला त्याचा पॅन अथवा आधार नंबरही देण्याची आश्यकता नाही. मात्र, त्याला आपला मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. कारण तक्रार नोंदवताना आयकर विभागाकडून एक OTP पाठवला जाईल. हा ओटीपी न टाकता कुठल्याही प्रकारची तक्रार पोर्टलवर नोंदवली जाणार नीही. (फाईल फोटो)

मोबाईल अथवा ई-मेलवर आलेल्या ओटीपीच्या मदतीने व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आयकर कायदा 1961चे उल्लंघन, अघोषित मालमत्ता कायदा आणि बेनामी देवाण-घेवाण टाळण्यासाठीचा कायदा, याअंतर्गत तीन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तक्रार दाखल केली जाऊ शकते. हे तिनही फॉर्म विभागाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहेत. (फाईल फोटो)

तक्रार नोंदवल्यानंतर आयकर विभाग तक्रारदाराला एक यूनिक नंबर अॅलॉट करेल. यामुळे तक्रार दाराला आपल्या तक्रारीचे स्टेटस विभागाच्या वेबसाईटवच ऑनलाईन पाहता येऊ शकते. (फाईल फोटो)

सध्या सुरू असलेल्या योजनेनुसार, बेनामी संपत्तीसंदर्भात 1 कोटी रुपये आणि परदेशातील काळ्या धनासह इतर टॅक्स चोरीसंदर्भात काही अटींसह 5 कोटी रुपयांपर्यंत बक्षीस देण्याची तरतूद आहे. (फाईल फोटो)

मात्र, या नव्या सुविधेत कुणीही व्यक्ती माहिती देऊ शकते आणि बक्षीसासदेखील पात्र होऊ शकते. (फाईल फोटो)

Read in English