सरकार आपल्याला दर महिन्याला देईल पैसे, आयुष्यभर रहाल टेन्शन फ्री; जाणून घ्या किती रुपये होणार क्रेडिट?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 11:09 PM2022-11-07T23:09:58+5:302022-11-07T23:23:49+5:30

Pension Scheme : अम्ही आपल्याला एका अशा स्कीम संदर्भात माहिती देत आहोत, ज्या स्कीमअंतर्गत सरकार आपल्या खात्यात दर महिन्याला 5000 रुपयांपर्यंत ट्रान्सफर करेल.

केंद्र सरकारच्या वतीने अनेक सरकारी स्कीम चलविल्या जात आहेत. आज अम्ही आपल्याला एका अशा स्कीम संदर्भात माहिती देत आहोत, ज्या स्कीमअंतर्गत सरकार आपल्या खात्यात दर महिन्याला 5000 रुपयांपर्यंत ट्रान्सफर करेल. या स्कीमअंतर्गत आपल्याला आयुष्यभर पैसे मिळत राहतील.

1 ऑक्‍टोबरपासून बदलले नियम - या सरकारी योजनेचे नाव आहे, अटल पेन्शन योजना. 1 ऑक्टोबरपासून या योजनेचे नियम बदलले आहेत. आता केवळ असेच लोक या स्‍कीमचा लाभ घेऊ शकतात, जे इनकम टॅक्‍स स्‍लॅबमध्ये येत नाहीत. यात 18 वर्षांपासून ते 40 वर्षांपर्यंतचे लोक रजिस्ट्रेशन करवा करू शकतात.

पेन्शन स्वरुपात मिळतील पैसे - सरकारकडून वयाच्या 60 व्या वर्षापासून प्रत्येक महिन्याला 1000 ते 5000 रुपयांपर्यंतची रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते. तुम्हाला दरमहा मिळणारी रक्कम तुमच्या योगदानावर अवलंबून असते.

अशा पद्धतीने द्यावे लागेल प्रीमियम - या योजनेअंतर्गत, आपण मासिक, त्रैमासिक, सहामाही अशा पद्धतीने प्रीमियम भरू शकता. जर आपल्याला दरमहिन्याला 5000 रुपये मिळवायचे असतील तर, वयाच्या 18 व्या वर्षापासून दरमहा 210 रुपये जमा करावे लागतील. तसेच, जर आपण वयाच्या 24 व्या वर्षापासून या योजनेसाठी सुरुवात करत असाल तर दरमहा 346 रुपये जमा करावे लागतील.

काय आहे अटल पेन्शन योजना - अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) ही एक सरकारी योजना आहे. यात आपली गुंतवणूक आणि आपल्या वयानुसार, आपल्याला किती पेन्शन मिळेल? हे निश्चित होते. ही योजना 2015 मध्ये सुरू झाली आहे.

मृत्युनंतर काय होणार - जर काही कारणास्तव एखाद्या व्यक्तीचा मृत्यू वयाच्या 60 वर्षांपूर्वी झाला, तर या अटल पेन्शन योजनेचे पैसे त्याने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला मिळतात.

कोणत्या बँकेत उघडू शकता अकाउंट - अटल पेन्शन योजनेत आपले अकाउंट ओपन करण्यासाठी आपल्याला ज्या बँकेत आपले सेव्हिंग अकाउंट आहे, तेथे जाऊन APY रजिस्ट्रेशन फार्म भरावा लागेल. याच बरोबर आपले आधार आणि मोबाइल नंबरही द्यावा लागेल. यानंतर त्या बँक खात्यातून आपली इंस्टॉलमेन्ट दर महिन्याला अपोआप कटत जाईल.