LIC कर्मचाऱ्यांना दुप्पट लाभ; २५ टक्के पगारवाढ, ५ दिवसांचा आठवडा आणि... By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 09:38 PM 2021-04-16T21:38:42+5:30 2021-04-16T21:42:29+5:30
कोरोनाच्या कठीण काळात केंद्र सरकारने LIC च्या लाखो कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC च्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोनाच्या कठीण काळातही केंद्र सरकारने LIC कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे.
वेतनवाढीकडे डोळे लावून बसलेल्या LIC च्या लाखो कर्मचाऱ्यांना सरकारने दोन मोठी गिफ्ट दिली आहेत. केंद्र सरकारकडून गुरुवारी LIC च्या कर्मचाऱ्यांची सुधारित वेतन श्रेणीचा अध्यादेश जारी केला आहे.
LIC कर्मचाऱ्यांना तब्बल २५ टक्के वेतनावाढ सरकारकडून मंजूर करण्यात आली आहे. तसेच कामकाजाचा ५ दिवसांचा आठवडा केंद्र सरकारने मान्य केला आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास १ लाख ४० हजार कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. वेतनवाढीच्या वृत्ताने LIC कमर्चाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे.
२०१७ पासून LIC मध्ये वेतन आढावा बाकी होता. नवीन वेतनवाढ १ ऑगस्ट २०१७ पासून लागू होणार आहे. त्यामुळे वेतनवाढीचा फरक १ ऑगस्ट २०१७ पासून कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
LIC कर्मचारी संघटनांनी ४० टक्के वेतवाढीची मागणी केली होती. तसेच केंद्र सरकारने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट १८८१ च्या कलम २५ मध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे ५ दिवसांचा कामकाजाचा आठवडा एलआयसीला आता लागू होणार आहे.
आता LIC ची सर्व कार्यालये सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस काम करतील. प्रत्येक शनिवार आता रविवार प्रमाणे सुट्टी ग्राह्य धरली जाणार आहे.
दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्गुतंवणूक योजनेंतर्गत LIC मधील हिस्सा विकण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना केली होती.
आगामी काही काळात LIC चा IPO येणार असल्याचे सांगितले जात आहे. आयपीओतील १० टक्के हिस्सा एलआयसीच्या पॉलिसीधारकांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.
LIC मधील हिस्सा विक्रीतून किमान एक लाख कोटींचा निधी उभारण्याचे सरकारचे उद्दिष्ट्य आहे असून, ते निश्चितच साध्य होईल, असा विश्वास देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम यांनी अलीकडेच व्यक्त केला आहे.