पहिल्यापेक्षा अधिक सोपं झालं Aadhaar Card वर पत्ता बदलणं; पाहा संपूर्ण प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 04:51 PM2021-06-21T16:51:31+5:302021-06-21T16:58:52+5:30

Aadhaar Card एक महत्त्वाचं दस्तऐवज मानलं जातं. घसबसल्या यातील महत्त्वाच्या बाबी दुरूस्त करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.

सध्या आधार कार्ड आपल्या महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक झालं आहे. सरकारी योजना असतील किंवा अन्य कोणत्या बाबी अनेक ठिकाणी आधार कार्डाबाबत विचारणा केली जाते.

परंतु जर तुमच्या आधार कार्डावरील पत्ता किंवा अन्य कोणती माहिती बदलायची असेल तर तो बदल करणं आता पूर्वीच्या तुलनेत अधिक सोपं झालं आहे. याशिवाय या गोष्टी तुम्हाला घरबसल्याही बदलता येणार आहेत.

UIDAI नं पत्ता, नाव, जन्मतारीख असे महत्त्वाचे बदल करण्याची प्रक्रिया आता सोपी केली आहे. आता मोबाईल फोनद्वारे घरबसल्या हे काम करणं सोपं झालं आहे. जर तुम्हाला नाव, पत्ता, जन्मतारीख यात कोणतेही बदल करायचे असतील तर खालील प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागेल.

आधार कार्डावर पत्ता बदलण्यासाठी resident.uidai.gov.in या वेबसाईटवर जा. त्यानंतर Aadhaar Update Section मध्ये देण्यात आलेल्या 'Request Aadhaar Validation Letter' वर क्लिक करा. त्यानंतर सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल ओपन होईल.

त्यानंतर तुमच्या १२ अंकी आधार कार्डाद्वारे लॉग इन करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे एक लिंक येईल.

ओटीपी आणि कॅप्चा टाकून व्हेरिफाय करा. त्यानंतर 'Proceed to Update Address' वर क्लिक करून Update Address via Secret Code चा पर्याय निवडावा लागेल.

सिक्रेट कोड एन्टर केल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या सबमिट या बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला दिसणारा अपडेच रिक्वेस्ट नंबर सेव्ह करून ठेवा.

जर तुम्हाला आधार कार्डावर नावात काही बदल करायचा असेल तर तुम्हाला प्रथम ssup.uidai.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंत त्या ठिकाणी असलेल्या प्रोसिड टू अपडेट या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.

त्यानंतर ओपन झालेल्या पेजवर १२ अंकी आधार कार्ड क्रमांकानं लॉग इन करा. यानंतर स्क्रिनवर देण्यात आलेल्या कॅप्चा टाका आणि त्यानंतर सेंड ओटीपीवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल.

ओटीपी एन्टर केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल. त्यामुळे तुमची वैयक्तिक माहिती तुम्हाला टाकावी लागेल. या ठिकाणी तुम्हाला नावापासून ईमेल आयडीपर्यंतचे पर्याय उपलब्ध आहेत.

त्यानंतर जर तुम्हाला नावात बदल करायचा असेल तर Name वर क्लिक करा. परंतु यासाठी तुमच्या एकडे एक अन्य आयडीप्रुफ असणं आवश्यक आहे. आयडी प्रुफ म्हणून पॅन कार्ड, लायसन्स, वोटर आयडी, रेशनकार्डाचा वापर करता येऊ शकतो.

सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक व्हेरिफिकेशन ओटीपी येईल त्यानंतर तो व्हेरिफाय करून सेव्ह चेंजवर क्लिक करा. अशाच प्रकारे तुम्हाला याच वेबसाईटवरून आपली जन्मतारीखही बदलता येईल.

यासाठीही सर्वप्रथम तुमचा आधार क्रमांक टाकून तो व्हेरिफाय करा. त्यानंतर ओटीपी आणि कॅप्चा कोड टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करा. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करून Date Of Birth निवडा. त्यानंतर त्यात आवश्यक ते बदल करून घ्या.

दरम्यान, ही प्रोसेस करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आधार कार्डमध्ये सातत्यानं अपडेट करण्याची परवानगी देण्यात आली नाही.

जन्म तारखेबद्दल नियम अतिशय कडक आहेत. ती तुम्ही केवळ एकदाच अपडेट करू शकता.