Gold Rate: जगातील 'या' देशात सर्वात स्वस्त सोनं मिळतं; जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याची किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 12:50 PM2023-07-13T12:50:35+5:302023-07-13T12:58:23+5:30

सोन्याच्या किंमती बाबतीत दुबईनंतर थायलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. थायलंडचे चायना टाउन सोन्याच्या दागिन्यांसाठी जगप्रसिद्ध आहे.

Gold Rate: सध्या सोन्या-चांदीचे दर आपल्या देशात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पण, अन्य देशात सोन्याच्या किंमती किती आहेत ते आपल्याला माहिती आहे का? चला पाहूया किती आहे किंमती.

Gold Rate: दुबई हे फक्त उंच इमारतींसाठी जगभर प्रसिद्ध नाही तर स्वस्त आणि चांगल्या दर्जाच्या सोन्यासाठीही प्रसिद्ध आहे. जगभरातून श्रीमंत लोक इथे सोने खरेदीसाठी येतात.

सध्या दुबईमध्ये सोनीचा दर 48,723.09 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर भारतात 10 ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे 54,250 रुपये आहे. इथल्या डेराला सोन्याचा हब म्हणतात. येथे अनेक सोन्याची दुकाने आहेत, जिथे भारतीय सेलिब्रिटी आणि श्रीमंत लोक खरेदी करतात.

Gold Rate: दुबईचे सोने इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगले असल्याचे सांगितले जाते. सोन्याच्या दागिन्यांवर अतिशय बारकाईने काम केले जाते.

तसेच, त्याची रचना देखील अतिशय सुंदर आहे. अशा प्रकारे, तिथून सोने खरेदी केल्यावर, वेगवेगळ्या डिझाइनचे इच्छित दागिने मिळतात.

त्याचबरोबर सोन्याच्या बाबतीत दुबईनंतर थायलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. थायलंडचे चायना टाउन सोन्याच्या दागिन्यांसाठी जगप्रसिद्ध आहे.

चीन, जपान, भारत, पाकिस्तान आणि अमेरिकेसह अनेक देशांतून लोक येथे सोने खरेदीसाठी येतात. बँकॉक, थायलंडमध्ये तुम्ही कमी किमतीत चांगल्या दर्जाचे सोने खरेदी करू शकता. येथे तुम्हाला अगदी कमी फरकाने सोन्याचे दागिने मिळतील.

Gold Rate: कंबोडिया त्यांच्या चांगल्या दर्जाच्या सोन्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. भारताच्या तुलनेत येथे सोन्याचे भाव खूपच कमी आहेत. कंबोडियामध्ये सध्या सोन्याचा भाव 45,735.46 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

शुद्ध सोन्याच्या बाबतीत हाँगकाँगही मागे नाही. हाँगकाँगची गणना जगातील सक्रिय सोने व्यापार बाजारपेठांमध्ये केली जाते. हाँगकाँगमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,867 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

स्वित्झर्लंड हे केवळ स्विस बँकेसाठी प्रसिद्ध नाही, तर जगभरात सोन्याच्या डिझाइनसाठी प्रसिद्ध आहे. सोन्याच्या विविध डिझाईन्सची घड्याळे येथे उपलब्ध आहेत.

विशेष म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये आजही कारागीर हाताने दागिने बनवतात. स्वित्झर्लंडमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,899 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.