China got down on its knees and praised India in market
चीननं गुडघे टेकले, भारताचं गुणगान करणारच By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 06:17 PM2020-07-18T18:17:57+5:302020-07-18T18:35:39+5:30Join usJoin usNext लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सीमारेषेवर तणाव निर्माण झाल्यानंतर भारतीय नागरिकांनी चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. चीनच्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठेतून हद्दपार करण्याचं भारतीयांनी ठरवलं. भारतीयांच्या या प्रयत्नाचा परिणाम दिसून येत आहे. कारण, चीनी कंपन्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. भारताने काही दिवसांपूर्वी 59 चीनी अॅपला भारतात बंदी घातली. त्यानंतर, भारतीय नागरिकांच्या मोबाईलमधून हे अॅप हटविण्यात आले आहेत. युसी वेब, युसी न्यूज आणि वीमेट यांनी तर आपलं दुकान गुंडाळायला घेतल्याचं समजतंय. त्यामुळेच, स्मार्टफोन बनविणाऱ्या चीनी कंपन्यांनी, शाओमी, विवो, हायर, ओपो आणि वन प्लस या कंपन्यांनी आपल्या मार्केटींग आणि जाहिरात योजनांमध्ये, स्टॅटेजीमध्ये बदल केला आहे. एकप्रकारे चीनने भारतीयांसमोर गुडघे टेकले, असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. कारण, या कंपन्यांचं अस्तित्व भारतात टिकवून ठेवण्यासाठी त्यांना भारताचं गुणगान गावंच लागणार आहे. एका मोठ्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ऑफ द रेकॉर्ड माहिती देताना, आम्हीही कंपनीचं नवीन उत्पादन लाँच करताना स्ट्रेटीजीमध्ये बदल करत असल्याचे सांगितले. फेस्टीव सिझनच्या उत्पादनात आणि गुंतवणुकीतही मोठा बदल होत आहे. तुर्तास, 1 महिन्यासाठी सर्वकाही बंद असल्याचंही ते म्हणाले. वीवो, रियल मी, शाओमी आणि वन प्लस कंपन्यांकडून लोकल उत्पादन वाढविण्यात येत असून मेक इन इंडियाला आपल्या जाहिरातीमध्ये प्राधान्य देण्यात येत असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. तर, कंपन्यांकडून उत्पादित वस्तूच्या पॅकेजिंगमध्येही मेक इन इंडिया हे नाव लिहण्यास प्राधान्य असणार आहे शाओमीने तर आपल्या दुकानांवरील चीनी होर्डींग्ज हटवले असून मेक इन इंडिया लिहिण्यास सुरुवात केली आहे. मार्केटच्या आकलनानुसार, इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन कंपन्या एकूण आपल्या प्रोडकच्या प्रमोशनसाठी वर्षाला 2500 कोटी रुपये खर्च करते. गेल्या तीन महिन्यात म्हणजे एप्रिल ते जून या तिमाहीत या चीनी कंपन्यांनी प्रतिस्पर्धी सॅमसंग कंपनीच्या मार्केटचा भाग गमावला आहे. चीनी स्मार्टफोन भारतातील 80 टक्के ग्राहकांना त्यांच्याकडे वळविण्यात यशस्वी ठरल्या होत्या. तर 40 टक्के टेलिव्हीजनही चीनी कंपन्यानांचेच विकले जात असून 6 ते 7 टक्के गृहपयोगी साहित्यही चायनाचेच वापरण्यात येते. टॅग्स :चीनभारतव्यवसायchinaIndiabusiness