म्हणून कोक, पेप्सी आणि बिसलेरीला ठोठावण्यात आला ७२ कोटींचा दंड, १५ दिवसांत रक्कम जमा करण्याचे आदेश By बाळकृष्ण परब | Published: February 11, 2021 09:15 AM 2021-02-11T09:15:55+5:30 2021-02-11T10:50:36+5:30
Coke, Pepsi and Bisleri fined by CPCB : बिसलेरीला १०.७५ कोटी रुपये, पेप्सिको इंडियाला ८.७ कोटी आणि कोकाकोला बेवरेजेसला ५०.६६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. शितपेय क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या असलेल्या कोक, पेप्सिको आणि बिसलेरी यांना तब्बल ७२ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. सेंट्र्ल पॉल्युशन कंट्रोल बोर्ड (CPCB) ने कोक, पेप्सिको आणि बिसलेरीला प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे डिस्पोजल आणि कलेक्शनची माहिती सरकारी बॉडीला न दिल्याने ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या कंपन्यांना, १५ दिवसांच्या आत दंडाच्या रकमेचा भरणा करण्याचे आदेश दिले आहेत.
CPCB ने बिसलेरीला १०.७५ कोटी रुपये, पेप्सिको इंडियाला ८.७ कोटी आणि कोकाकोला बेवरेजेसला ५०.६६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्लॅस्टिक कचऱ्याच्याबाबतीत एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पाँसिब्लिटी (ईपीआर) एक पॉलिसीचा मानदंड आहे. ज्याच्या आधारावर प्लॅस्टिकची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना प्रॉडक्टच्या डिस्पोजलची जबाबदारी घ्यावी लागणार आहे.
सर्वाधिक ५०.६६ कोटी रुपयांचा दंड हा कोका कोला बेवरेजेसला ठोठावण्यात आला आहे. कोका कोलाजवळ चार हजार ४१७ टन प्लॅस्टिक कचरा होता. त्यावर पाच हजार रुपये प्रतिटन या हिशोबाने दंड आकारण्यात आला आहे. हा कचरा जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळातील होता. पतंजलीवरही एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पतंजलीवरही एक कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
तर बिसलेरीकडे प्लॅस्टिकचा कचरा हा सुमारे २१ हजार ५०० टन एवढा होता. त्यावर पाच हजार रुपये प्रति टन या दराने दंड आकारला गेला आहे. तसेच पेप्सीकडे ११ हजार १९४ टन प्लॅस्टिक कचरा होता. ज्यावर ८.७ कोटी रुपये दंड आकारला गेला.
कोका कोला बेवरेजेसने त्यांना CPCB कडून नोटिस मिळाल्याचे मान्य केले आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, CPCB च्या ऑर्डरची समीक्षा सुरू आहे. तसेच संबंधित ऑथॉरिटीसोबत यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. तर पेप्सिकोने सांगितले की, आम्ही प्लॅस्टिक कचऱ्याच्या बाबतीत ईपीआर अंतर्गत पूर्ण प्रक्रियेचे पालन करतो. मात्र तरीही नोटिस मिळाली असेल तर त्यावर आम्ही विचार करू
याबाबत बिसलेरीच्या प्रवक्त्याने सांगितले की, बिस्लेरी ही एक नियमांचे पालन करणारी संस्था आहे आणि पीडब्ल्यूएमचे नियम, निर्देश व वेळोवेळी देण्यात आलेल्या आदेशांच्या तरतुदींचे पालन करते. आम्ही सीपीसीबीने केलेल्या सूचनेनुसार एसपीसीबी / पीसीसीच्या मान्यतेनुसार सर्व आवश्यक कागदपत्रे वेळेवर सादर केली आहेत. एक समर्पित आणि सामाजिक जबाबदार कॉर्पोरेट म्हणून आम्ही सरकारने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन केले आहे. आम्ही प्लॅस्टिक विभाग आणि प्लास्टिक पुनर्वापर करण्याबाबत जागरूकता निर्माण करत आहोत. आम्ही कॉर्पोरेट्स, शाळा आणि आरडब्ल्यूएच्या माध्यमातून नागरिकांना प्रशिक्षण देत आहोत.
पेप्सिको आणि कोका कोला या कंपन्या शितपेयाच्या निर्मितीमधील आघाडीच्या कंपन्या आहेत. तर बिसलेरी बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करते. हे सर्व प्लॅस्टिक कचऱ्याच्या विभागात मोडतात. तसेच या तिन्ही कंपन्यांचे प्रॉडक्ट्स देशात प्रचलित आहेत.