CoronaVirus : कोरोनाच्या लढ्यात उद्योगपतींचं मोठं योगदान; कोट्यवधींचं केलं दान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 03:56 PM2020-03-31T15:56:58+5:302020-03-31T21:36:52+5:30

मुकेश अंबानींच्या रिलायन्स फाऊंडेशननं मोदींच्या पीएम केअर फंडाला ५०० कोटी, तर महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यचा निधीला 5 कोटींची मदत केली असून, रिलायन्सने कोरोनाबाधित रुग्णांसाठी 100 बेडचं मुंबईमध्ये सेव्हन हिल्स हॉस्पिटल समर्पित केलं आहे. NGOबरोबर पार्टनरशीप करत विविध शहरांमध्ये मोफत अन्नदान करत आहेत.

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसुद्धा व्हेंटिलेटर तयार करणार असून, त्याची किंमत फक्त ७५०० रुपये असणार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी आयसीयू व्हेटिंलेटर बनवणाऱ्या स्वदेशी कंपनीसोबत काम करत आहे. सध्या एका व्हेंटिलेटर्स मशिनची किंमत ५ ते १० लाख रुपयांपर्यंत आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीही अनेक मदतीचे हात पुढे सरसावले असून, उद्योगपती अनिल अग्रवाल यांनीसुद्धा कोट्यवधींची मदत देणार असल्याचं सांगितलं आहे.

टाटा समूहदेखील या संकटाच्या काळात मदतीसाठी पुढे आलेला असून, १५०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. तसेच मार्च आणि एप्रिल महिन्यांचा पूर्ण पगार देणार असल्याचंही टाटांनी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिलं आहे.

बजाज समूहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज यांनीसुद्धा कोरोनाशी दोन हात करण्यासाठी १०० कोटींची मदत दिलेली असून, एनजीओबरोबर काम करून ते शहरी भागासह ग्रामीण भागात महत्त्वाची उपकरणं आणि संसाधनांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

हीरो मोटार्सचे अध्यक्ष पंकज एम मुंजाल यांनीसुद्धा १०० कोटींचं योगदान देण्याची घोषणा केली असून, कंपनी विविध राज्यांमध्ये मदतकार्य राबवत असल्याचं सांगितलं आहे.

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आणि त्यांची पत्नी अनुपमा नडेला यांनीसुद्धा कोरोनाग्रस्तांसाठी २ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

इन्फोसिसच्या सुधा मूर्ती यांनीसुद्धा कर्नाटकातील १००० शाळांमध्ये स्मार्ट क्लास सुरू करण्यासाठी २० कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे.

शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनू कुमार जैन यांनीसुद्धा कंपनीकडून कर्नाटक, पंजाब आणि दिल्लीतल्या रुग्णालय आणि पोलिसांना एन ९५ मास्कचा पुरवठा करण्याचं जाहीर केलं आहे.

पेटीएमचे सर्वेसर्वा विजय शेखर शर्मा यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा पगार देणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच कोरोना व्हायरसवर लस शोधणाऱ्या भारतीय संशोधकांना ५ कोटी देण्याचंही जाहीर केलं आहे.