Coronavirus: ना एसी कोच, ना कुठला स्टॉप, लॉकडाऊननंतर रेल्वेप्रवास 'नॉनस्टॉप'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 03:32 PM2020-04-09T15:32:09+5:302020-04-09T15:42:21+5:30

railway minstery and rail department change some rule for passenger in front of corona virus in india.

रेल्वे मंत्रालयाने १५ एप्रिलपासून संभाव्य रेल्वे प्रवासासंदर्भात काही नियमावली आखण्यास सुरु केली आहे. त्यानुसार, प्रवाशांना रेल्वे सुटण्याच्या ४ तास अगोदर स्थानकावर यावे लागणार आहे.

रेल्वे स्थानकावर या प्रवाशांच थर्मल स्क्रिनींग तपासणी केली जाणार आहे, केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकावर प्रवेश मिळणार आहे.

सध्या मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेकडून फक्त नॉन एसी (स्लीपर श्रेणी) रेल्वे गाड्या सुरु करणार आहे. आपल्या प्रवासाच्या १२ तास अगोदर प्रवाशांना रेल्वेकडे आपल्या आरोग्याची माहिती द्यायची आहे.

सध्या रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश न देण्याचं ठरविण्यात आलं आहे. तसेच, कोरोना संक्रमित व्यक्ती प्रवास करताना आढळल्यास या व्यक्तीस मध्येच रेल्वे गाडीतून उतरविण्यात येणार आहे.

रेल्वे प्रवास हा नॉन स्टॉप असणार आहे, एका स्टेनशनवरुन दुसऱ्या स्टेशनवर रेल्वे थांबेल, गरज किंवा अत्यावश्यक असेल तरच १-२ स्थानकांवर गाडीला थांबा देण्यात येईल. या रेल्वेमधील एसी कोच पूर्णत: बंद असणार आहेत.

रेल्वे प्रवाशांना प्रवासात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे, तसेच एका केबिनमध्ये ( ६ बर्थ) फक्त दोनच प्रवासी प्रवास करु शकणार आहेत.

रेल्वे सध्या उत्पन्नाचा नाही, तर पूर्णपणे प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करीत आहे, असे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. कोरोनाचा संसर्ग आणखी पसरत तर नाही ना याची खात्री करणे आवश्यक आहे पीटीआयने याबाबतचे वृत्त दिले आहे.

लॉकडाऊननंतर रेल्वेने प्रवास करताना सर्व प्रवाशांना मास्कशिवाय प्रवास न करण्याचे आवाहन केले जाईल. प्रवासादरम्यान मास्क वापरला गेला नाही, तर प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

केंद्र सरकारने आरोग्य सेतू हे अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपचा आधार घेत सरकारकडून प्रवाशांच्या तब्येतीची तपासणी केली जाणार आहे, तपासणीत एखादा प्रवासी आजारी असल्याचे आढळले तर त्याला प्रवास करू दिला जाणार नाही.

लॉकडाऊन संपल्यानंतरही ज्या भागाला कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून जाहीर केले गेले असेल त्या स्थानकांवर ट्रेन न थांबवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

देशातील ७०० जिल्ह्यांपैकी २०० पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे संकट दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर या सर्वच जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. दैनिक भास्कर वृत्त समुहाने, १४ एप्रिलनंतर देशातील रेल्वेसेवा सुरळीत सुरु होईल की नाही, याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही.

‘लॉकडाऊन’चे बऱ्यापैकी पालन होत असतानाच विविध राज्यांमधून हजारो स्थलांतरित कामगारांचे तांडे घराकडे परतत असल्याच्या बातम्यांनी देशभर गहजब झाला होता. त्यानंतर, ‘लॉकडाऊन’ पाळला नाही, तर या धोक्यापासून देशाला वाचविणे कठीण होऊन बसेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले होते.