coronavirus : देश का नमक... 'टाटां'च्या दर्यादिलीवर नेटीझन्स फिदा, कडक सॅल्यूट अन् आभार By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 01:32 PM 2020-03-29T13:32:45+5:30 2020-03-29T13:50:01+5:30
Remember the old ad on ur television... "TATA Namak, Desh ka Namak" & yes Mr. Ratan Tata had proved that again. tata declare 1500 crore rupees to fight against corona ट्विटरवर सध्या टाटा नमक हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे, नेटीझन्सकडून रतन टाटा यांना कडक सॅल्यूट मारला जात आहे.
देशावर आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी टाटा ट्रस्टकडून नेहमीच योगदान दिलं जातं. गेल्या ७० वर्षातील सर्वात मोठं संकट म्हणून सध्या कोरोना आणि देशातील लॉकडाऊनकडे पाहिलं जातंय.
देशातील अग्रगण्य उद्योजक आणि संदेवनशील व्यक्ती असलेल्या रतन टाटा यांनी कोरोनाच्या लढाईसाठी पंतप्रधान निधीत ५०० कोटींची मदत टाटा ट्रस्टकडून जाहीर केली होती. त्यानंतर, टाटा सन्सकडून कोरोनाच्या लढाईसाठी आणखी १ हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.
टाटा कंपनी आणि ग्रुप्सने यापूर्वीही देशावरील संकटात आपलं योगदान दिलं आहे. आताही, देशसेवेत योगदान देण्याची हीच ती वेळ आहे. सध्याच्या काळाजी गरज आणि इतर वेळेपेक्षा आपलं योगदान देण्याची हीच ती वेळ असल्याचे टाटा यांनी सांगितले आहे.
टाटा समूहाकडून वैद्यकीय उपकरणे आणि वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या खरेदींसाठी ५०० कोटी रुपये देण्यात येत आहेत, असे पत्र रतन टाटा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलं आहे. त्यानंतर, टाटा सन्सने १००० कोटींची मदत जाहीर केली
रतन टाटांच्या या कार्याचे सोशल मीडियावर मोठं कौतुक होत असून टेटीझन्सने रतन टाटा यांचे आभार मानले आहेत. अनेक दिग्गजांनीही टाटांच्या या दातृत्वाला सलाम केला आहे.
टाटा ग्रुपकडून कोरोनाच्या लढाईत विविधप्रकारे योगदान देण्यात येत आहे. मुंबईतील टाटा ग्रुप्सच्या हॉटेल्सकडून वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना जेवणही पुरविण्यात आले.
मैने इस देश का नमक खाया है, टाटा नमक देश का नमक... असे म्हणत ट्विटर आणि फेसुबकवरुन रतन टाटा यांचे आभार मानले जात आहेत.
देशावरीस प्रत्येक संकटात टाटा कंपनी आणि टाटा कुटुंबीय देशवासियांच्या मदतीसाठी पुढे येते, देशात प्लेगची साथ आली होती, तेव्हाही जमशेदजी टाटा यांनी पुढाकार घेतला होता.
देश का असली नमक. देश की सेहत- देश का नमक असा संदेशही सोशल मीडियातून देण्यात येतोय.
अनेकांनी रतन टाटा यांच्या या कार्याबद्दल अंतकरणापासून आभार मानतं, त्यांच्या कौर्याल वंदन केलंय.
पुणे पोलिसांनीही रतन टाटांच्या मदतीच्या कार्याला कडक सॅल्यूट केलाय.
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टानेही अमेझिंग म्हणत टाटा यांच्या दर्यादिलीचं कौतुक करत विनम्रपणे हात जोडले आहेत.
अनेकांनी टाटांच्या या कृतीला लव्ह आणि रिस्पेक्ट देत असल्याचं म्हटलंय. नेटीझन्सकडून टाटा यांचे मोठ्या प्रमाणात आभार मानले जात आहेत.
नक्कीच रतन टाटा यांनी देऊ केलेली रक्कम खूप मोठी आहे, १५०० कोटी रुपयांची मदत देशाच्या आरोग्य यंत्रणासाठी त्यांनी देऊ केलीय.
अतिशय क्रिएटीव्हरितीने नेटीझन्सकडून रतन टाटा यांचे आभार मानले जात आहेत.
राज ठाकरे म्हटले होते, काहीच लोकं आहेत, ज्यांच्यापुढे नतमस्तक व्हावसं वाटंत, त्यात रतन टाटा. इन्फोसेसचे प्रमुख नारायणमूर्ती यांनी टाटांचे पाय धरत त्यांचे आशीर्वाद घेतले होते तो क्षण