Travel Credit Card : विमानाने प्रवास करताय? मग, 'या' क्रेडिट कार्ड्सवर एअरपोर्ट लाउंज अ‍ॅक्सेससह मिळतील अनेक फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 02:38 PM2024-08-13T14:38:00+5:302024-08-13T15:05:13+5:30

Travel Credit Card : ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड हे प्रवास करणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.

अनेकांना प्रवास करण्याची आवड असते. पण, यासाठी वेळ काढणं आणि पैसे उभं करणं थोडं कठीण असतं. मात्र, थोडा विचार केला तर, अशा प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या अनेक समस्या तुम्ही कमी करू शकता. यासाठी ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.

यामध्ये तुम्हाला एअरपोर्ट लाउंज, ट्रॅव्हल माइल्स आणि वायफाय सारख्या सुविधा मिळतात. सुरुवातीच्या काळात एअरपोर्ट लाउंज फक्त श्रीमंत लोकांसाठी असल्याचं मानलं जात होतं. पण, आता काही क्रेडिट कार्डद्वारे या सुविधा प्रत्येकासाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळं अशा काही क्रेडिट कार्ड्सबद्दल माहिती जाणून घ्या...

एचडीएफसी बँकेने या कार्डवर कोणतेही ज्वॉइनिंग फी ठेवलेले नाही. यामध्ये १५० रुपये खर्च केल्यावर तुम्हाला २ रिवॉर्ड पॉइंट मिळतात. यामध्ये तुम्हाला जगभरातील लाउंज वापरण्याची सुविधा मिळते.

या कार्डची ज्वॉइनिंग फी १० हजार रुपये आहे. यामध्ये १५० रुपये खर्च केल्यावर तुम्हाला ५ पट रिवॉर्ड पॉइंट मिळतात. यामध्ये तुम्हाला गोल्फ कोर्स, बुकमायशो, टाटा क्लिक, ओला कॅब्स इत्यादीसाठी व्हाउचर मिळतात. याशिवाय क्लब मॅरियट, टाइम्स प्राइम, स्विगी वन, फोर्ब्स आणि ॲमेझॉन प्राइमची वार्षिक मेंबरशिप सुद्धा मिळते.

या कार्डसाठी ठराविक रक्कम भरल्यानंतर तुम्हाला ज्वॉइनिंग फी देण्याची गरज नाही. यामध्ये तुम्हाला लाउंजचा एक्सेस मिळतो. याशिवाय, वर्षभरासाठी सहा हजार रुपयांची चित्रपट तिकिटेही मिळतात.

या कार्डवर देशांतर्गत विमानतळावर लाउंज अॅक्सेस मिळत आहे. याशिवाय, प्रायोरिटी पास प्रोग्रॉमचे फ्री मेम्बरशिप ही दिले जाते. कार्डमधून २०० रुपये खर्च केल्यावर तुम्हाला ४ क्लब विस्तारा पॉइंट मिळतात. याशिवाय १ प्रीमियम इकॉनॉमी फ्लाइट तिकीट देखील वेलकम गिफ्ट म्हणून मिळतात.

या कार्डद्वारे तुम्हाला चेक इन, इमिग्रेशन आणि पोर्टर सर्व्हिस मिळते. तसेच अनलिमिटेड लाउंज अॅक्सेस सुद्धा मिळतो. कार्डची ज्वॉइनिंग फी १२,५०० रुपये आहे. मात्र, एका वर्षात २५ लाख रुपये खर्च केल्यास ते माफ केले जाते.