Credit Card Tips: एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड बाळगताय?; समजून घ्या, ते फायद्याचं आहे की तोट्याचं By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 03:50 PM 2022-01-18T15:50:03+5:30 2022-01-18T15:59:26+5:30
Credit Card Tips: आजकाल क्रेडिट कार्डाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण अशातच एकापेक्षा अधिक कार्ड ठेवणं फायद्याचं आहे की तोट्याचं हे पाहावं लागेल. Credit Card Tips: आजकाल क्रेडिट कार्डचा वापर वाढत आहे. बँकाही आता अधिकाधिक लोकांना क्रेडिट कार्ड देण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकदा शॉपिंग मॉलमध्ये (Shopping Mall) क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँकेच्या एजंटशी (Bank Agent) तुमची गाठ पडते, तुम्हाला अनेक ऑनलाइन ऑफर्सही (Online Offers) दिल्या जातात.
बर्याच लोकांकडे आता एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्डही असल्याचं आपण पाहतो. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे की त्याचे अधिक फायदे आहेत की तोटे? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड असल्याचे कोणते फायदे आणि तोटे आहेत.
अधिक कार्ड ठेवण्याचा फायदा म्हणजे बॅलन्स ट्रान्सफर सुविधा. एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असण्याचा एक फायदा आहे की जेव्हा तुम्ही आर्थिक अडचणींमुळे क्रेडिट कार्डचे बिल भरू शकत नसाल तेव्हा तुम्ही बॅलन्स ट्रान्सफरची सुविधा वापरू शकता. या सुविधेअंतर्गत तुम्ही एका क्रेडिट कार्डचे बिल दुसऱ्या क्रेडिट कार्डने भरू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला काही व्याजही द्यावे लागेल.
ऑनलाइन शॉपिंगच्या युगात, वेगवेगळ्या शॉपिंग वेबसाइट्स वेगवेगळ्या क्रेडिट कार्डांवर सूट किंवा कॅशबॅक देतात. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असल्यास, तुमच्याकडे निवडण्यासाठी अधिक पर्याय असतील आणि तुम्ही सर्वाधिक सूट मिळणाऱ्या कार्डावरून खरेदी करू शकाल.
नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी क्रेडिट कार्डवर १० लाखांपेक्षा जास्त क्रेडिट लिमिट मिळवणे खूप अवघड आहे, परंतु तुम्ही वेगवेगळ्या बँकांकडून प्रत्येकी एक लाख मर्यादेची १० कार्डे घेऊ शकता.
एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असण्याचा एक मोठा फायदा हा आहे की जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डावरील रक्कम वेळेवर भरत राहिल्यास क्रेडिट स्कोअर खूप चांगला होतो.
जसं अनेक क्रेडिट कार्डांचे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. तुम्ही ईएमआयच्या फंदात पडू शकता कारण अधिक क्रेडिट कार्डे तुम्हाला अधिक खरेदी करण्यास प्रवृत्त करतील, हे निश्चित आहे. ईएमआय घेताना सहज परतफेड करता येईल असे वाटू शकते पण तसे होत नाही. अधिक क्रेडिट कार्डे असल्याने तुमच्यावर अधिक ईएमआय होऊ शकतो.
जर तुमच्याकडे जास्त क्रेडिट कार्ड असतील तर तुम्ही जास्त खरेदी कराल, तर तुमच्यावरील कर्ज वाढेल. क्रेडिट कार्डवर खर्च करणे हे देखील एक प्रकारचे कर्जच आहे. याशिवाय तुमच्या क्रेडिट कार्डवर वार्षिक शुल्क असल्यास, तुम्हाला दरवर्षी मोठी रक्कम भरावी लागेल.
यापासून वाचण्यासाठी २ ते ३ कार्डांपेक्षा अधिक कार्ड ठेवू नका. शक्य असल्यास लाईफटाईम फ्री कार्डची निवड करा. अशा कार्डांवर वार्षिक फी द्यावी लागत नाही. क्रेडिॉ कार्डाचा वापर विचारपूर्वक करा आणि शॉपिंग करण्यापूर्वीही विचार करा.