Crorepati Tips: कोट्यधीश बनण्याचा हीट आहे ‘हा’ फॉर्म्युला, ३०० रुपये वाचवून १ कोटींचा बँक बॅलन्स करा तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 10:24 AM2023-03-20T10:24:40+5:302023-03-20T10:34:29+5:30

नोकरदार व्यक्ती असोत की व्यापारी असोत. प्रत्येकाची आपण श्रीमंत व्हावं अशी इच्छा असते.

नोकरदार व्यक्ती असोत की व्यापारी असोत. प्रत्येकाची आपण श्रीमंत व्हावं अशी इच्छा असते. कोट्यधीश होण्यासाठी खूप पैसे कमावण्याची गरज नाही. योग्य मार्गाने पैसे गुंतवणं आवश्यक आहे.

तुम्हाला दर महिन्याला काही पैसे वाचवावे लागतील आणि हे पैसे योग्य ठिकाणी गुंतवावे लागतील. याच्या मदतीने तुम्ही दीर्घ मुदतीसाठी स्वत:साठी मजबूत फंड तयार करू शकता. आजपासून हे काम करून बघा, काही वर्षात तुम्ही सुद्धा कोट्यधीश बनू शकता (How to Become Crorepati). दरमहा ३०० रुपयांची बचत करून तुम्ही एक कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी कसा तयार करू शकता, पण ते कसं शक्य आहे हे आपण पाहू.

कोट्यधीश होण्यासाठी तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी दर महिन्याला पगार मिळताच त्यातून बचतीचे पैसे बाजूला ठेवावे लागतील. तज्ज्ञांच्या मते, ज्या गुंतवणूकदारांना त्यांची गुंतवणूक कोट्यवधींमध्ये पाहायची आहे त्यांच्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम पर्याय आहे.

जर कोणी वयाच्या ३० व्या वर्षी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर त्याला ३० वर्षे सातत्यानं गुंतवणूक करण्याची संधी आहे. त्यांनी इक्विटी म्युच्युअल फंडाच्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये (SIP) गुंतवणूक करावी, असं तज्ज्ञ म्हणतात.

कोट्यधीश होण्यासाठी जर तुम्ही दिवसाला १० रुपये देखील वाचवले तर तुमचे महिन्याला ३०० रुपये वाचतील. आता तुम्ही म्युच्युअल फंडात SIP केल्यास चांगला फंड तयार करू शकता.

जर तुम्ही ३५ वर्षांसाठी दर महिन्याला ३०० रुपये SIP करत असाल आणि तुम्हाला त्यावर १८ टक्क्यांचा परतावा मिळत असेल, तर ३५ वर्षांनंतर तुम्हाला १.१ कोटी रुपये मिळतील.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही. तुम्ही दरमहा ४०० ते ५०० रुपयांच्या गुंतवणुकीसह सुरुवात करू शकता. दरमहा १५ ते २० हजार रुपये कमावणारे लोकही दीर्घकालीन गुंतवणूक करून कोट्यधीश होऊ शकतात.

(टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)