जबरदस्त रिटर्न! 'या' अनोळखी Cyptocurrency नं झटक्यात गुंतवणूकदारांना केलं लखपती, २० लाखांचा फायदा By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 09:07 AM 2022-01-10T09:07:40+5:30 2022-01-10T09:14:33+5:30
Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सीचं मार्केट अनिश्चिततेचं आहे. परंतु एका क्रिप्टोकरन्सीनं गुंतवणूकदारांना झटक्यात लखपती केलं. Cryptocurrency Investment : क्रिप्टोकरन्सी मार्केट (Cyptocurrency Market) अनिश्चिततेने भरलेले आहे. याचा अंदाज क्वचितच कोणी बांधू शकेल. कोणतं क्रिप्टो गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न देईल हे कोणीही सांगता येत नाही.
एकीकडे गेल्या अनेक दिवसांपासून डिजिटल करन्सीच्या विशेषतः बिटकॉईनच्या वाढत्या आणि घसरलेल्या किमतींमुळे गुंतवणूकदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे, मीम क्रिप्टोकरन्सीने जबरदस्त परतावा देऊन आपल्या गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे.
अनेकदा बिटकॉईनची किंमत (Bitcoin Price) घसरल्यानंतर अन्य प्रसिद्ध क्रिप्टो टोकन (popular crypto tokens) च्या किंमतींतही घसरण होताना दिसून येतं. परंतु काही कॉईन्स अशाही असतात ज्यामध्ये आश्चर्यजनकरित्या तेजीही दिसून येते.
एलियन शीबा इनु (Alien Shiba Inu-ASHIB) या क्रिप्टोकन्सीनं चोवीस तासांतच कमाल केली आहे. या क्रिप्टोकरन्सीचं नाव एका डॉग ब्रीडवर ठेवण्यात आलं आहे.
CoinMarketCap च्या आकडेवारीनुसार Alien Shiba Inu (ASHIB) नावाच्या करन्सीची किंमत २४ तासांत १९०० टक्क्यांपर्यंत वाढली. याचा अर्थ जर एखाद्यानं २४ तासांपूर्वी ASHIB मध्ये १ लाखांची गुंतवणूक केली असेल तर एका दिवसात त्याचं मूल्य २० लाख झालं.
९ जानेवारी म्हणजेच रविवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास ASHIB $0.0075 वर व्यवहार करत होता. CoinmarketCap वेबसाइटनुसार, ASHIB कडे जास्तीत जास्त 100 दशलक्ष नाण्यांचा पुरवठा आहे.
परंतु अशाप्रकारे गुंतवणूक करण्यापासून सावध राहीलं पाहिजे. जर तुम्ही ASHIB मध्ये झालेली वाढ पाहून यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सध्या या बाबतीत फारच कमी माहिती उपलब्ध आहे.
मार्केट कॅपच्या बाबतीत हे ३३५६ व्या क्रमांकावर आहे. कोणताही क्रिप्टो तज्ज्ञ गुंतवणूकदारांना इतक्या कमी रँकच्या कॉईनमध्ये आपले पैसे गुंतवून पैसे धोक्यात टाकण्याचा सल्ला देणार नाहीत.
इतकंच नाही तर ASHIB कोणत्याही लोकप्रिय क्रिप्टो एक्सचेंज (Crypto Exchanges) वर उपलब्ध नाही. इतकंच नाही, तर हे कोणत्याही भारतीय क्रिप्टो एक्सचेंजवरही अद्याप उपलब्ध नाही.