D Mart Damani seals countrys largest real estate deal at Rs 1238 cr for 28 luxury apartments
देशातील आजवरची सर्वात मोठी रिअल इस्टेट डील! २८ आलिशान अपार्टमेंटसाठी १,२३८ कोटी मोजले, कुणी केली पाहा... By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 11:07 AM2023-02-06T11:07:46+5:302023-02-06T11:43:03+5:30Join usJoin usNext उद्योगपती आणि डीमार्ट (Dmart) चे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी देशातील आजवरची सर्वात मोठी रिअल इस्टेट डील केली आहे. दमानींच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि सहकाऱ्यांनी मुंबईत तब्बल १,२३८ कोटी रुपयांचे तब्बल २८ हाउसिंग यूनिट्स खरेदी केले आहेत. रजिस्ट्रेशन अहवालातील माहितीच्या हवाल्यानं Zapkey.com नं ही माहिती दिली आहे. दमानी यांची ही डील अतिशय महत्वाची मानली जात आहे. कारण २०२३ च्या अर्थसंकल्पातील घोषणांमुळे १ एप्रिलपासून सुपर लक्झरी मालमत्तांवर परिणाम होईल असा अंदाज आहे. गृहनिर्माण मालमत्तेसह दीर्घकालीन मालमत्तांच्या विक्रीतून भांडवली नफ्याच्या पुनर्गुंतवणुकीवर १० कोटी रुपयांची मर्यादा अर्थसंकल्पात घालण्यात आली आहे. सध्या अशी कोणतीही मर्यादा नाही. लमत्तांचे एकूण चटईक्षेत्र (कार्पेट एरिया) १,८२,०८४ चौरस फूट कागदपत्रांनुसार काही मालमत्ता कंपन्यांच्या नावावर खरेदी करण्यात आल्या आहेत. राधाकिशन दमानी, त्यांचे सहकारी आणि कंपन्यांनी खरेदी केलेल्या मालमत्तांचे एकूण चटईक्षेत्र १,८२,०८४ चौरस फूट आहे, ज्यामध्ये १०१ कार पार्किंगचा समावेश आहे. सर्व व्यवहारांची नोंदणी ३ फेब्रुवारी २०२३ रोजी झाली आहे. कुठे आहेत ही लक्झरी अपार्टमेंट्स? मुंबईच्या वरळी भागातील अॅनी बेझंट रोडवर असलेल्या थ्री सिक्स्टी वेस्टच्या 'टॉवर बी'मध्ये अपार्टमेंट खरेदी करण्यात आले आहेत. या करारातील विक्रेता बिल्डर सुधाकर शेट्टी आहे, ज्यांनी प्रकल्पाचा पुनर्विकास करण्यासाठी रिअल इस्टेट विकासक विकास ओबेरॉय यांच्यासोबत भागीदारी केली आहे. यापैकी बहुतेक अपार्टमेंट्सचे कार्पेट क्षेत्र ५,००० चौरस फूट आहे आणि त्यांची किंमत सरासरी ४० ते ५० कोटी रुपये आहे.शेअर बाजारात गुंतवणूकदार म्हणून केली होती करिअरची सुरुवात राधाकिशन दमानी हे रिटेल व्यवसायाचे 'बादशहा' मानले जातात. त्यांनी १९८० च्या दशकात स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूकदार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. पण एका कल्पनेनं त्याचं नशीब पालटलं आणि त्याच्या संपत्तीत अवघ्या २४ तासात १००% वाढ झाली. Dmart चा IPO 2017 मध्ये आला होता. २० मार्च २०१७ पर्यंत राधाकिशन दमानी हे केवळ एका रिटेल कंपनीचे मालक होते, परंतु २१ मार्च रोजी सकाळी त्यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची बेल वाजवताच त्यांची संपत्ती १०० टक्क्यांनी वाढली. वास्तविक, डीमार्टचा शेअर ६०४.४० रुपयांवर लिस्ट झाला होता, तर इश्यूची किंमत २९९ रुपये ठेवण्यात आली होती. हा परतावा मोजायचा झाल्यास १०२ टक्के इतका होता.लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत व्हाईट' म्हणून प्रसिद्ध आहेत. फ्युचर ग्रुपचे कुमार मंगलम बिर्ला आणि किशोर बियाणी यांनी या क्षेत्रात पायही ठेवला नव्हता अशा काळात त्यांनी रिटेल व्यवसायाची सुरुवात १९९९ मध्ये केली होती.