सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात पुन्हा केली वाढ, किती महिन्याचा मिळणार फरक? By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 12:41 PM 2023-06-16T12:41:22+5:30 2023-06-16T12:50:34+5:30
सरकारने केलेला बदल १ जानेवारी २०२३ पासून लागू होईल. म्हणजेच कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या पगारासह सहा महिन्यांची थकबाकी मिळणार आहे. 6व्या वेतन आयोगाअंतर्गत डीएचा दर २१२% वरून २२१% करण्यात आला. तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. केंद्र सरकार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या अशा कर्मचार्यांसाठी ज्यांना ५ व्या वेतन आयोगानुसार पगार मिळतो, सरकारने डीएमध्ये प्रचंड वाढ केली आहे.
कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये १६% ची बंपर वाढ करण्यात आली आहे. अशा कर्मचाऱ्यांचा डीएचा दर सध्या मूळ वेतनाच्या ३९६% होता. बदलानंतर, डीए आता मूळ वेतनाच्या ४१२ टक्के करण्यात आला आहे.
सरकारने केलेला बदल १ जानेवारी २०२३ पासून लागू होईल. म्हणजेच कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या पगारासह सहा महिन्यांची थकबाकी मिळणार आहे.
वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाच्या वतीने असे सांगण्यात आले की केंद्र सरकार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या कर्मचार्यांसाठी महागाई भत्ता (DA) चा दर सध्याच्या ३९६% वरून ४१२ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
५ व्या केंद्रीय वेतन आयोगानुसार ३९६ %. यापूर्वी एप्रिल २०२३ मध्ये, केंद्र आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या कर्मचार्यांसाठी सहाव्या वेतन आयोगांतर्गत DA चा दर २१२% वरून २२१% पर्यंत वाढवण्यात आला होता.
सध्या केंद्र सरकार ७ व्या वेतन आयोगांतर्गत पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना मूळ पगाराच्या ४२ टक्के महागाई भत्ता देत आहे.
७व्या वेतन आयोगांतर्गत यापूर्वी ४ टक्के वेतनवाढ होते, ती वाढून ४२ टक्के झाली आहे. ही वाढ १ जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात आली. आता पुढील महागाई भत्ता केंद्र सरकार ऑक्टोबरमध्ये सप्टेंबरमध्ये जाहीर करणार आहे.
यावेळीही महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे मूळ वेतनाच्या ४६ टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित आहे.
ऑक्टोबरमध्ये करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याची घोषणा १ जुलैपासून लागू होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाही तीन ते चार महिन्यांची थकबाकी मिळणार आहे.