पोस्ट ऑफिस योजनेत २ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर फिक्स २९,७७६ रुपये परतावा; कोण घेऊ शकतो लाभ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 11:43 IST2025-03-25T11:37:57+5:302025-03-25T11:43:27+5:30

Post Office Schemes : ज्याप्रमाणे देशातील सर्व बँका त्यांच्या ग्राहकांसाठी एफडी (फिक्स्ड डिपॉझिट) खाती उघडतात, त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिस देखील त्यांच्या ग्राहकांसाठी टीडी (टाईम डिपॉझिट) खाती उघडते.

जास्तीत जास्त परतावा मिळवण्याच्या नादात आपण अनेकदा चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करुन बसतो. गेल्या काही वर्षात लाखो भारतीय गुंतवणूकदारांची विविध स्पाँजी स्किममध्ये फसवणूक झाली आहे. मुंबईतील टोरेंस घोटाळा तुम्हालाही माहिती असेल. त्यामुळे आजही पोस्ट ऑफिसच्या योजना लोकांमध्ये लोकप्रिय आहेत.

पोस्ट ऑफिसमध्ये बचत योजनांतर्गत खाते उघडल्यास, तुम्हाला केवळ बँकांपेक्षा जास्त व्याज मिळत नाही तर तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात. पोस्ट ऑफिसच्या एका योजनेत तुम्ही २ लाख रुपये जमा करून २९,७७६ रुपये निश्चित व्याज मिळवू शकता.

देशातील सर्व बँका त्यांच्या ग्राहकांसाठी बचत ठेव (फिक्स्ड डिपॉझिट) योजना उघडतात. त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिस देखील त्यांच्या ग्राहकांसाठी टीडी (टाईम डिपॉझिट) खाती उघडते. पोस्ट ऑफिसचा टीडी अगदी बँकांच्या एफडी खात्यासारखा असतो.

पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षे आणि ५ वर्षांच्या कालावधीसाठी टिडी खाती उघडण्याची सुविधा ऑफर करते. केंद्र सरकारच्या अंतर्गत कार्यरत असलेले पोस्ट ऑफिस TD खात्यांवर ६.९ टक्के ते ७.५ टक्के व्याज देत आहे. पोस्ट ऑफिसमध्ये २ वर्षाच्या TD वर ७.० टक्के व्याज उपलब्ध आहे.

देशातील कोणताही नागरिक पोस्ट ऑफिस टीडी योजनेत खाते उघडू शकतो. तुम्ही टीडी खात्यात किमान १००० जमा करू शकता, तर कमाल ठेवीवर कोणतीही मर्यादा नाही. ग्राहक त्याच्या इच्छेनुसार त्याला हवे तेवढे पैसे जमा करू शकतो.

पोस्ट ऑफिसमध्ये 2 वर्षांच्या टीडीमध्ये २ लाख रुपये जमा केले असल्यास, मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण २,२९,७७६ रुपये मिळतील. म्हणजे यावर तुम्हाला २९,७७६ रुपये निव्वळ आणि निश्चित रक्कम मिळणार आहे.