रॅपिडोची स्टोरी माहितीय का? ७५ वेळा आयडिया नाकारली; आज कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 13:47 IST2025-04-14T13:44:43+5:302025-04-14T13:47:12+5:30
rapido success story : रॅपिडोची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहिती आहे का? एका आयआयटी पदवीधर तरुणाने याची हैदराबादमधून सुरुवात केली.

आज 'रॅपिडो' हे नाव सर्वांना परिचित आहे. ही एक बाईक-टॅक्सी कंपनी आहे. रॅपिडो खासकरुन त्यांच्या बाईक सर्व्हिससाठी प्रसिद्ध आहे. तुम्हीही कधीतरी ऑफिसमध्ये किंवा जवळपास कुठेतरी जाण्यासाठी नक्कीच रॅपिडो बूक केली असेल. पण, ही कंपनी कशी उभी राहिली हे अनेकांना माहिती नाही. ही संकल्पना जवळजवळ ७५ वेळा नाकारण्यात आली. असे असूनही, आज ही कंपनी या स्थानावर आहे.
पवन गुंटुपल्ली हे रॅपिडोचे सह-संस्थापक आहेत. आज रॅपिडो कंपनीचा व्यवसाय कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या कंपनीचे मूल्य अंदाजे ६,७०० कोटी रुपये आहे. पवन यांच्यासाठी ही कंपनी उभी करणे सोपे नव्हते. सुरुवातीला त्यांना अनेक अडचणी आणि अपयशांना तोंड द्यावे लागले.
पवन गुंटुपल्ली हे आयआयटी पदवीधर असून ते तेलंगणा राज्यातील रहिवासी आहेत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर पवन यांनी काम करायला सुरुवात केली. ते सॅमसंगमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टीममध्ये काम करत होते.
पण, त्यांना स्वतःचे काहीतरी निर्माण करायचे होते. अशा परिस्थितीत त्यांनी त्यांचा मित्र अरविंद संका सोबत द करियर नावाचा स्टार्टअप सुरू केला. पण पवन यांचा हा स्टार्टअप फार काळ टिकला नाही. लवकरच त्यांना शटर खाली घ्यावे लागले.
पवन यांनी २०१४ मध्ये रॅपिडो सुरू केले. यासाठी पवन यांना गुंतवणूकदारांची आवश्यकता होती. पण गुंतवणूकदार शोधण्यात त्यांना खूप अडचणी आल्या. या स्टार्टअपमध्ये कोणीही गुंतवणूक करण्यास तयार नव्हते. पवन यांना यासाठी एकूण ७५ वेळा निराशेचा सामना करावा लागला. परंतु, त्यांनी जिद्द न सोडता प्रयत्न करत राहिले.