Do you need 50 thousand per month after retirement?; know About investment plan for future
निवृत्तीनंतर तुम्हाला पाहिजेत का महिन्याला ५० हजार?; तर आजच करा 'हे' काम By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 09:22 AM2023-02-19T09:22:07+5:302023-02-19T09:43:09+5:30Join usJoin usNext चंद्रकांत दडस (उपसंपादक, मुंबई): साधारण प्रत्येकालाच वयाच्या साठीनंतरसाठी आर्थिक नियोजन कसे करावे याची चिंता असते. जर योग्य वयात गुंतवणुकीसाठी सुरुवात केली नाही तर मात्र निवृत्तीनंतर इतरांकडे पैशांसाठी हात पसरावे लागतात. त्यामुळे नोकरी लागल्यानंतर तत्काळ निवृत्तीच्या नियोजनाचा विचार करणे आवश्यक आहे. जर आपण काही वर्षांनंतर निवृत्त होणार असाल तर प्रत्येक वर्षी आपल्या मासिक गरजा वाढत जातील. कोणत्या योजनेत पैसे गुंतवल्यास आपल्याला ५० हजार रुपये महिन्याला मिळतील ते पाहू... म्युच्युअल फंड - इक्विटी आणि डेट या दोन्ही प्रकारात अनेक प्रकारच्या योजना यामध्ये उपलब्ध आहेत. आपण या गुंतवणुकीद्वारे वर्षानुवर्षे पुरेशी संपत्ती जमा केली की, अँन्यूटी प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही भाग वापरला जातो. ज्यामुळे गुंतवणूकदारांना जीवन विमा संरक्षणासह आजीवन उत्पन्नाची हमी मिळते. प्रत्येक महिन्याला ५० हजार रुपये किंवा प्रति वर्ष ६ लाख रुपये मिळण्यासाठी आपण बीएएफ किंवा डीएएफ योजनांमध्ये गुंतवणूक करावी. एफडी(FD) - ज्येष्ठ नागरिकांसाठी सध्या एफडी दर वर्षाला ७.५ टक्के आहे, तर महिन्याला ५० हजार रुपये मिळण्यासाठी तुम्हाला ८० लाख रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजना ७.४ टक्के वार्षिक व्याज दरासह एक सुरक्षित पर्याय आहे. तुम्ही प्रत्येक योजनेत फक्त १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. मात्र, यात सातत्याने एफडी व्याजदर बदलण्याचा धोकाही असतो. पेन्शन योजना - हमी परताव्यासह पेन्शन योजना या नियमित पेन्शन योजना आहेत, ज्यामध्ये गुंतवणूकदारांना विमा संरक्षणही मिळते. या योजनेमध्ये सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला एक ठरावीक रक्कम दिली जाते. या योजना निवृत्तीनंतर २५ ते ३० वर्षांसाठी महिन्याला पेन्शन देण्यासह एकरकमी मोठी रक्कमही देतात. यातून तुम्हाला दर महिन्याला ५० हजार रुपयांची पेन्शन मिळू शकते. याशिवाय वार्षिकी योजना, युनिट लिंक्ड विमा योजना, एनपीएस व पोस्ट खात्यातील गुंतवणुकीचे पर्यायही आहेत. यातून महिन्याला ५० हजार रुपयांची पेन्शन अगदी आरामात उभी करता येईल. मात्र, त्यासाठी करावे लागेल गुंतवणुकीचे योग्य नियोजन.टॅग्स :गुंतवणूकInvestment