ट्रम्प यांच्या विजयाचा भारतावर परिणाम नाही; शेअर मार्केट क्रॅश होण्यामागची महत्त्वाची ५ कारणे By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 03:06 PM 2024-11-07T15:06:49+5:30 2024-11-07T15:11:17+5:30
Share market Crash : डोनाल्ड ट्रम्प जिंकल्यानंतर भारतीय बाजारपेठेत उसळी आली होती. मात्र, गुरुवारी भारतीय बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. यामागे अमेरिकेची निवडणूक हे एकच कारण नाही. बुधवारी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या नेत्या कमला हॅरिस यांचा पराभव करून दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र, भारतीय शेअर बाजारात ट्रम्प यांच्या विजयाचा उत्साह फार लवकर संपला आहे. गुरुवारी भारतीय बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.
रिपब्लिकन विजयाचे भारतीय बाजारावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम होऊ शकतात हे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले. गुरुवारी सेन्सेक्सने ९०० हून अधिक अंकांची घसरण नोंदवली, तर निफ्टी २४,२०० च्या खाली पोहोचला. अमेरिकन बाजारात पूर्णपणे उलट प्रतिक्रिया दिसून आली, जिथे डाऊ जोन्स ३.५७% ने वाढला आणि Nasdaq ३% ने वाढून नवीन विक्रमी उच्चांक गाठला.
MAGA इफेक्ट : डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा मेक अमेरिका ग्रेट अगेनचा नारा अमेरिकेच्या विकासाला बळ देणार आहे. जो भारतासारख्या इतर वाढत्या बाजारपेठांच्या तुलनेत अमेरिकन बाजारांच्या बाजूने आहे.
उच्च उत्पन्न : ट्रम्प आल्यानंतर आयातीवर टॅक्स लादण्याच्या धोरणांमुळे महागाई वाढेल. ज्यामुळे अमेरिकेच्या उत्पन्नावर दबाव वाढेल आणि दर कपातीचा वेग मंदावेल. गेल्या आठवड्यात अमेरिकन बाँड्समध्ये १४ बेसिक पॉइंट्सची वाढ झाली होती.
रुपया सार्वकालिक नीचांकी पातळीवर : ट्रम्प यांच्या विजयामुळे येत्या काही महिन्यांत डॉलरला चालना मिळण्याची शक्यता आहे. परिणामी गुरुवारी रुपयाने डॉलरच्या तुलनेत ८४.२९५० च्या पातळीवरील सर्वकालीन नीचांकी पातळी गाठली.
रेट कटिंग सायकल : फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपात धोरणाचा अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहे. जर यूएस व्याजदर कपातीचे चक्र अपेक्षेपेक्षा लहान असेल तर त्याचा भारताच्या दर कपातीच्या चक्रावरही परिणाम होऊ शकतो.