केवळ १ रूपया देऊन मिळेल दुप्पट व्हॅलिडिटी; पाहा Airtel चा जबरदस्त प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 04:21 PM2021-03-14T16:21:58+5:302021-03-14T16:25:44+5:30

Airtel : पाहा कोणता आहे हा प्लॅन आणि व्हॅलिडिटीसोबतही काय मिळतं अधिक

सध्या देशात दूरसंचार कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा सुरू आहे. अनेक कंपन्या सातत्यानं काही ना काही नवे प्लॅन्स ग्राहकांसाठी आणत असतात.

अशातच दिग्गज कंपनी एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी सातत्यानं काही नवे प्लॅन आणताना दिसतं. परंतु यातून आपण कोणता प्लॅन निवडावा याबद्दल अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो.

परंतु आज आपण जाणून घेणार आहोत असा प्लॅन ज्यामध्ये केवळ १ रूपया अधिक देऊन तुन्ही दुप्पट व्हॅलिडिटी मिळवू शकता.

जर तुम्हाला ४०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे रिचार्ज करू इच्छिता तर तुम्हाला यात दोन प्लॅन्स मिळतात.

त्यापैकी एक म्हणजे ३९८ रूपये आणि दुसरा म्हणजे ३९९ रूपये. यामध्ये ३९८ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची व्हॅलिडिटी दिली जाते.

तर ३९९ रूपयांच्या प्लॅनवर ग्राहकांना ५६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.

याचाच अर्थ १ रूपया अधिक देऊन तुम्ही अधिक व्हॅलिडिटी मिळवू शकता. दोन्ही प्लॅनमध्ये दररोज मिळणारा डेटा जरी कमी अधिक असला तरी एकूण मिळणारा डेटा मात्र तितकाच आहे.

एअरटेलच्या ३९८ रूपयांच्या प्लॅनसोबत २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. तसंच यासोबत सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसही दिले जातात.

याशिवाय या प्लॅनमध्ये २८ दिवसांकरिता दररोज ३ जीबी डेटा देण्यात येतो. याप्रकारे २८ दिवसांसाठी एकूण ८४ जीबी डेटा मिळतो.

या प्लॅनसोबत ग्राहकांना प्राईम व्हिडीओचा मोबाईल एडिशन अॅपचं ट्रायलदेखील मिळतं.

याशिवाय Airtel Xstream Premium, हॅलो ट्युन्स, विंक म्युझिक, शॉ अकॅडमीचा मोफत कोर्स आणि FASTag च्या खरेदीवर १०० रूपयांचा कॅशबॅकही मिळतो.

एअरटेलच्या ३९९ रूपयांच्या प्लॅनसोबत ५६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. तसंच यात दररोज १.५ जीबी डेटा देण्यात येतो.

याप्रकारे युझर्सना ५६ दिवसांकरिता ८४ जीबी डेटा देण्यात येतो. याव्यतिरिक्त अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधाही देण्यात येते.

याशिवाय या प्लॅनसोबत प्राईम व्हिडीओचं ट्रायलही देण्यात येतं.

Airtel Xstream Premium, हॅलो ट्युन्स, विंक म्युझिक, शॉ अकॅडमीचा मोफत कोर्स आणि FASTag च्या खरेदीवर १०० रूपयांचा कॅशबॅकही अशा सुविधाही या प्लॅनसोबतदेखील देण्यात येतात.