during atm transaction beware of online fraud follow these tips
ATM चा वापर करताना 'ही' काळजी घ्या; अन्यथा होईल मोठं नुकसान By कुणाल गवाणकर | Published: November 29, 2020 03:40 PM2020-11-29T15:40:43+5:302020-11-29T15:43:37+5:30Join usJoin usNext डिजिटल बँकिंगचा जमाना असला तरीही रोखीत व्यवहार करणाऱ्यांची संख्या अतिशय मोठी आहे. बँकेत जमा असलेली रोख रक्कम काढण्यासाठी एटीएमचा वापर करतात. एटीएमच्या माध्यमातून घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एटीएम वापरताना काळजी घेणं गरजेचं आहे. कायम गर्दीच्या ठिकाणी असलेल्या एटीएमचा वापर करा. फारशी वर्दळ नसलेल्या ठिकाणी जास्त फसवणुकीचे अधिक प्रकार घडतात. एटीएममधून रोकड काढत असताना आसपास लक्ष ठेवा. कोणी तुमच्यावर लक्ष तर ठेवत नाहीए ना, याची खात्री करून घ्या. एटीएममधून रोकड काढल्यावर मिळणारी पावती कुठेही फेकून नका. या पावतीवर असलेल्या मजकुराचा गैरवापर होऊ शकतो. व्यवहार पूर्ण झाल्यावर नेहमी कॅन्सल बदल दाबा. एटीएममधून निघताना कार्ड सोबत घेतलंय ना, याची काळजी घ्या. सीसीटीव्ही कॅमेरा, सुरक्षारक्षक असलेल्या एटीएमचा वापर करा. रोकड काढताना अपरिचित व्यक्तीची मदत घेऊ नका. एटीएममधून बाहेर पडण्याआधीच रोकड मोजून घ्या. सार्वजनिक ठिकाणी रोकड मोजू नका. तुमच्या खात्यातून रोख रक्कम काढली गेल्याचा मेसेज आल्यास, पण एटीएममधून रोख न आल्यास तात्काळ बँकेकडे तक्रार करा. तुमचा पिन नंबर कोणालाही सांगू नका. बँक कधीही तुमचा पिन क्रमांक, पासवर्ड मागत नाही. त्यामुळे एसएमएसच्या माध्यमातून विचारणा होत असल्यास अशी कोणतीही माहिती देऊ नका.Read in Englishटॅग्स :एटीएमatm